डॉ. शिवनाथ कुंभारे यांना राष्ट्रसंत साहित्य विशेषांक भेट राष्ट्रसंताच्या ग्रामसुधारणावादी साहित्याचे पुण्यतिथी विशेषांकातून प्रभावी दर्शन – डॉ. शिवनाथजी कुंभारे
MB NEWS (महाराष्ट्राची बातमीपत्र)गडचिरोली:-
मानवतेचे महान पुजारी थोर तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५५ व्या पुण्यतिथी तथा सर्व संत स्मृतीमानवता दिनाचा कार्यक्रम देशविदेशातील श्रीगुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत गुरूकुंज आश्रम येथे नुकताच संपन्न झाला. गुरूकुंज आश्रम येथील श्री गुरुदेव प्रकाशन विभागाच्या वतीने या निमित्ताने साहित्य विशेषांक प्रकाशित करण्यात आला . हा साहित्य विशेषांक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी गडचिरोली जिल्हा सेवाधिकारी तथा सुप्रसिद्ध समाजसेवी व्यक्तीमत्व डॉ. शिवनाथजी कुंभारे यांना सस्नेह भेट दिला. याप्रसंगी सेवा मंडळाचे जिल्हा सचिव अरविंद पाटील वासेकर, पंडीत पुडके, सौ. रजनी बोढेकर, मुख्याध्यापिका सौ . गीता पाटील, पंकज भोगेवार आदींची उपस्थिती होती.
हा विशेषांक राष्ट्रसंताच्या समग्र साहित्यावर आधारित असून येथील लेख वाचनीय असल्याचे मत डॉ. कुंभारे यांनी व्यक्त केले. त्यांनी याप्रसंगी श्री गुरुदेव मासिक विभागाच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.
या विशेषांकाच्या निर्मितीसाठी श्री गुरुदेव वाड्.मय विभागाचे समिती प्रमुख भानुदास कराळे, विभाग प्रमुख गोपाल कडू, संपादक डॉ. दीपक पुनसे, सदस्य प्रभाकर गायकवाड, मनोहर रेचे, डॉ. संजय जेवढे, प्रा. रुपलाल कावळे, सौ. पौर्णिमाताई सवाई, सचिव प्रल्हाद गिरी , लेख संपादन सहकार्य बंडोपंत बोढेकर आदींनी या करिता विशेष परिश्रम घेतले.

