पळसखेड येथे भव्य संगीतमय भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह चे आयोजन,सात दिवस भव्य दिव्य पंचकुंडी लक्ष्मीनारायण महायज्ञ.
MB NEWS (पळसखेड़):- चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री सिद्धेश्वर, पाताळेश्वर पळसखेड नगरी मध्ये दिनांक 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या भागवत सप्ताह मध्ये सात दिवस भव्य दिव्य पंचकुंडी लक्ष्मीनारायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. व याच महायज्ञाला संतांचे पावन स्पर्श लागावे या साठी 22 तारखेला विराट संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

17 तारखेला या भागवत कथेला सुरुवात झाली असून सकाळी गावातून कलश यात्रा काढून कलश स्थापना करून या भागवत कथेला सुरुवात झाली, या सप्ताहामध्ये सकाळी सहा ते सात काकड आरती, सकाळी आठ ते आकर वाजेपर्यंत यज्ञ पूजन व हवन, दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत कथा प्रवक्ता प.पु.दीदी माँ साध्वी,श्री अर्पिता मानस भारतीजी,वनदेवी आश्रम तिनखेड़ा यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथा होत आहे.दररोज सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत हरिपाठ व सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले असून दररोज रात्री 8 ते 11 वाजता राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाच आयोजन करण्यात आल आहे. यामध्ये 18 तारखेला ह.भ.प. विनोदाचार्य लांडे महाराज, 19 तारखेला ह.भ.प.शिवदास महाराज शृंगारे ,20 तारखेला सप्त खंजिरी वादक ह.भ.प.संदीप पाल महाराज या नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.

22 नोव्हेंबर गुरुवार रोजी या संपूर्ण भागवत कथा व महायज्ञ संताच्या पावनस्पर्शाने पुनीत होण्यासाठी विराट संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री रामराजेश्वराचार्य माऊली, स्वामी जितेंद्रनाथ महाराज, महंत नर्मदा दासजी महाराज मध्य प्रदेश, महंत श्यामदासजी महाराज, महंत वासुदेव जी महाराज वृंदावन, महंत रामानुजमदासजी महाराज हरिद्वार ,यासह काशी राजस्थान उत्तराखंड येथील संत उपस्थित राहणार आहे. तर 23 तारखेला भव्य ग्राम दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून 24 तारखेला गोपाळकाल्याचे किर्तन ह भ प उमेश महाराज जाधव यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे व लगेचच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा भव्य भक्तांनी लाभा घ्यावा असे आव्हान आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

