तिवसा येथे राज्यस्तरीय शंकरपटाचे थाटात उद्घाटन शंकरपट हा शेतकऱ्यांना आनंद देणारा क्षण..

तिवसा येथे राज्यस्तरीय शंकरपटाचे थाटात उद्घाटन
शंकरपट हा शेतकऱ्यांना आनंद देणारा क्षण..

MB NEWS तिवसा(प्रतिनिधी):-शंकरपट हा शेतकऱ्यांना आनंद देणारा क्षण असून, तिवसा शहरात गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच अशा मैदानी खेळाचे आयोजन केल्याने जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर या शंकरपटाच्या आयोजनातून समाधान दिसून येत असल्याचे प्रतिपादन गुरुवारी भाजयुमो किसान आघाडीचे तात्यासाहेब हेंगडे यांनी केले. ते तिवसा शहरात आयोजित

राज्यस्तरीय शंकरपटाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर भाजपचेललित सुंदरकर, मकरंद कोरडे, संजय गिट्टे, राहुल भोसले, श्रीकांत भारती, संजय गुलक्षे, रविराज देशमुख, शंतनू देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना शंकरपटाची प्रतीक्षा लागून होती. भाजपचे रविराज देशमुख व मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून या शंकरपटाचे शहरात प्रथमच करण्यात आले. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम तसेचमराठवाडा येथून दिवसभरात ३०० च्यावर बैलजोड्या येथे दाखल झाल्या होत्या. तिवसा शहरातील गौरव भोंबे यांच्या सिद्धू-सिंघम या जोडीने उद्घाटनप्रसंगी भाग घेऊनउ पस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पुंडकर यांनी केले असून भाजप कार्यकर्ते शंकरपटासाठी परिश्रम घेत आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे