तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथे राष्ट्रीय महामार्गा वर भरधाव ट्रेलर उलटला

तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथे राष्ट्रीय महामार्गा वर भरधाव ट्रेलर उलटला

MB NEWS सुनिल घोरमाडे (तिवसा प्रतिनिधी):- अमरावती वरून नागपूरकडे जाणारा ट्रेलर चा अपघात झाला.ट्रेलर मध्ये लोखण्डी इलेक्ट्रिक पोल होते.या ट्रेलर चा अपघात शेंदोळा येथील आश्रम शाळेजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.सहा कडेला धडकून उलटला.या ट्रेलरचा क्र. सी.जी04 पिबी-7695 आहे. ट्रेलर चालकाचे नाव बलविंदर सिंह(रायपूर)असे आहे.ही घटना काल मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.ह्या ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गांवरच उलटला.त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.या ट्रेलर मध्ये लोखंडी पोल रोड वर पडले होते त्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.या अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलीस पोहचून वाहतूक सुरळीत केली.गावकर्यांनी घटना स्थळीच पोहचून मदत कार्य केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे