अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश भुजाडणे यांची निवड

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश भुजाडणे यांची निवड

MB NEWS (धामणगाव रेल्वे) :-गेल्या अनेक वर्षापासून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेमध्ये कार्यरत असलेल्या तसेच 2011 सारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडून अनेक समाज उपयोगी तसेच पत्रकारांच्या हितासाठी काम केलेले. दैनिक सकाळ, वृत्तकेसरी, लोकशाही वार्ता ,देशोन्नती अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये उमेश भुजाडणे यांनी काम केले.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून सतत चर्चेत असणारे उमेश भुजाडणे यांच्याकडे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारीनीने अमरावती जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.

धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर, वरुड, मोर्शी तिवसा…. या तालुक्यामध्ये ग्रामीण पत्रकारांचे जाळे पुन्हा तयार करून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच पत्रकारांना अधीस्वीकृती मिळावी यासाठी उमेश भुजाडणे जिल्ह्यात काम करणार असल्याचे केंद्रीय कार्यकारणी अध्यक्ष मनोहर जी सुने यांनी पत्रकारांना सांगितले.
केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते ठराव घेऊन त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्यासह इसुफ भाई खान (केंद्रीय कार्याध्यक्ष), सुरेशराव सवडे केंद्रीय महासचिव, अशोकराव पवार केंद्रीय सचिव, राजूभाऊ भुरे केंद्रीय उपाध्यक्ष, प्रदीप जी जोशी केंद्रीय उपाध्यक्ष, अशोकराव याउल केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, बाळासाहेब स्वर्गीकर महाराष्ट्र संघटक, बाबासाहेब खडसे निमंत्रित सदस्य, राजाभाऊ मनोरे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे