दर्यापूर ते अमरावती मार्गावरील खोलापुर फाट्याजवळ एसटी चालकावर हल्ला;अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल

दर्यापूर ते अमरावती मार्गावरील खोलापुर फाट्याजवळ एसटी चालकावर हल्ला;अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)अमरावती:- अकोट बस स्थानकाची बस क्रमांक एम एच 40 वाय 5714 चे चालक अमोल गावंडे राहणार आकोट हे सोमवार रोजी चार वाजता सुमारास अकोट ते नागपूर बस घेऊन जात असताना खोलापुर फाट्याजवळ 10 ते 15 लोकांनी बस थांबवण्यास सांगितले. मात्र, त्या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे चालकाने बस ही खोलापुर फाट्यावर थांबवली त्या दरम्यान बसच्या मागे दोन ते तीन अज्ञात लोकांनी येऊन बस चालकासोबत बस का नाही थांबवली म्हणून बाचाबाची सुरू केली. या दरम्यान त्यातीलच एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन बस चालकावर पाईपाने अचानक वार केला यात चालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाली आहे. त्यावेळी घटनास्थळी सुदैवाने खोलापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. सदर बस ही पोलिसांनी ठाण्यात घोऊन गेल्यानंतर चालकाच्या फिर्यादी नुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या सह पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अज्ञात आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे व पुढील तपास खोलापूर पोलीस करत आहेत.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे