झाडे लावा म्हनणारी सरकार झाडे ……
छत्तीसगडमधील हसदेव जंगल वाचवा आंदोलना बद्दल जेव्हा मी वाचली आणि यूट्यबवर वीडियो बघितला तर माझ्या अंगात शहारे आले आणि विचार करत बसली की, आपण किती शांतेत जगत आहोत. पण या भारतात असे राज्य आहेत जिथे आदिवासी रोज आपल्या जल, जंगल, जमिनीसाठी लढत आहेत. त्यातला एक राज्य म्हणजे छतीसगड. राज्यातलं हसदेव जंगल ,जिथे कोयला खनिज आहे म्हणून सरकार नी त्या जंगलाला अडाणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना विकून टाकली आहे. हसदेव जंगल विकण्याचा कारबार काँग्रेस पक्षापासुन सुरू आहे तर बीजेपी सरकार सुद्धा रोखू शकत नाही आहे, ही उदासीनता आहे. या हसदेव जंगल कटाईचा फायदा देशाच्या लोकांना व सरकारला कमी, तर अंबानी-अडाणीला जास्त होणार आहे. मानव आपल्या सोई सुविधासाठी आधुनिक विकासाच्या नावावर पर्यावरणाचा खूप मोठा नुकसान करत आहे. याचे संपूर्ण श्रेय सरकारला जातो. एका माणसाला संपूर्ण जीवन जगण्यासाठी चार ते पाच झाडांचा ऑक्सिजन लागतो. तर विचार करा आपण आपल्या जीवनात किती झाडे लावतो आणि जेव्हा मरतो तेव्हा आपल्या सरण रचायला सुद्धा लाकूड लागतेच, याचा विचार आपण का करीत नाही आणि सरकार सुद्धा का करत नाही हा प्रश्न निर्माण होतो.
सरकारच्या परवानगीने मोठमोठ्या कंपन्या हसदेव जंगलाची अंधाधुंद कटाई करत आहेत. मोठमोठ्या झाडांची कत्तल होत आहे पण मीडिया मात्र तिथे पोहोचू शकत नाही हे सुध्दा एक षडयंत्र आहे आणि तिथला आदिवासी हसदेव जंगलासाठी आंदोलन करत आहे.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मी आदिवासी आहे. कारण माझे पूर्वज स्वातंत्र्याच्या आदी पासुन जल, जंगल, जमिन वाचवण्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा माझे लोक लढतच आहेत. विश्वामध्ये भारतात जी सर्वात मोठी संपती आहे. ती म्हणजे जल, जंगल, जमीन. त्याची रक्षा करण्याची जबाबदारी निसर्गाने आदिवासींना दिली. काय संबंध आहे आदिवासीचा आणि जंगलाचा, जंगलात असणारे झाड, प्राणी, जीव जंतू प्रत्येकात देव दिसतो म्हणजे इतकं सुंदर नातं आहे म्हणजे आदिवासी जंगलाशिवाय राहूच शकत नाही. झाड त्याचे दैवत आहेत, तो जेव्हा एखाद्या झाडाची फुले किंवा पाने तोडतो तेव्हा झाडाला सांगून तोडतो की या फुलाची किंवा पानाची मला गरज आहे म्हणून मी तोडत आहे. मला माफ कर.. आदिवासी जितकं त्याला लागेल तितकाच तो निसर्गाकडून घेतो जास्तचा घेत नाही यात निसर्गामध्ये संतुलन असते. जर आदिवासी जंगलाचा अतिवापर केला असता तर जंगल राहिलेच नसते कारण पन्नास हजार पेक्षा अधिक वर्षापासून आदिवासी जंगलात राहतो . आता आपण आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचे तुकडे तुकडे करत आहोत. तुकडे करणारा मरून जाईल पण त्याची भरपाई मात्र येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो कोणीच त्या प्रलयपासून सुटणार नाही.
आज हसदेव जंगल वाचवण्यासाठी आदिवासी रस्त्यावर आहे सरकार सोबत भांडत आहे. ही लडाई दहा वर्षापासून सुरू आहे. पोलीस त्यांना मारत आहे जेलात सुध्दा टाकत आहे परंतु आदिवासी हार नाही मानत आहे. सरकार काँग्रेसची असो किंवा बीजेपीची कोणालाच आदिवासीचा आंदोलन दिसत नाही. मी कोणत्याच पक्षाची नाही पण पक्ष मात्र सर्वांसाठी असतो परंतु भारतात लोकतंत्र असून हा चित्र दिसत नाही. हसदेव जंगल परिसरात आदिवासी वास्तव्य करतो. त्याचे जीवन, घर, रीतिरिवाज, संस्कृती, राहणीमान, उदरनिर्वाह त्या जंगलातच झाला आहे. आता त्यांना त्या जंगलापासून वंचित करण्याचे षडयंत्र सरकार आणि प्रायव्हेट कंपनी करत आहे.
आदिवासी जंगलात वास करणारा एक साधाभोळा माणूस आहे. त्याचे मूलभूत अधिकार काय हे सुद्धा त्यांला माहित नाही. तरी सुद्धा त्यांच्या झोपडीच्या समोर Ak47 गण धारण करणारी मिलिटरी फोर्स असते. एक सामान्य पोलीस जरी आपल्या घरी आला तर आपली काय दशा होते विचार करा तर त्यांना किती भीती वाटत असेल जेव्हा मिलिटरी त्यांचा घराच्या समोर असते .. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही,चालायला सडक नाही, शिक्षणासाठी शाळा नाही, उपचारासाठी दवाखाना नाही, कोणतीही सुविधा त्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नाही पण मात्र मिलिटरी तिथे पोहचू शकते. अशी वागणूक सरकारची आदिवासी सोबत आहे…
भारतात पूर्वोत्तरमध्ये सेवन सिस्टर म्हणून प्रसिद्ध सात राज्य अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा आहेत तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्य पाचवी आणि सहावी अनुसूचीमध्ये येतात आणि सर्वात जास्त जंगल व खनिज संपदा इथेच आहे आणि सर्वात जास्त आदिवासी या जंगलातच राहतात म्हणून सर्वात जास्त अटेक सरकार आदिवासीवर करत आहे. कारण जर सरकारला जंगल आणि जमीन पाहिजे तर आदिवासींना जंगलापासुन बेदखल करणे गरजेचे आहे असे वाटते.शोषण, बलात्कार, भुकमरी, बेरोजगारी, अंधश्रद्धा पसरवुन आदिवासीना तेथून जाण्यासाठी विवश करताना दिसत आहे, म्हणून मणिपूरची लाजिरवाणी घटना या स्वतंत्र भारतात घडते आणि प्रधानमंत्री, राष्ट्रपती या विषयावर काहीच बोलत नाही हे कटू सत्य आहे. मी कोणताही पक्षाची नाही परंतु जे घडलेलं सत्य आहे व बघितलं आहे, मी कोणत्याही काल्पनिक कथावर विश्वास करणारी नाही मला जे दिसते त्यावरच विचार करते आणि बोलते. जर अन्याय होत असताना दिसत असून सुद्धा मला वाटते की काही घडतच नाही तर अजून काय बघायचं राहिला आहे हे विचार करणे गरजेचे आहे.
आपण आपल्या घराची, संपत्तीची रक्षण किती प्रामाणिकरित्या करतो. पण ती तर नस्वर असते तरी सुद्धा आपल्याला वाटते की मी नाही तर माझी येणारी पिढी सुखात राहो. परंतु विचार करा आज आपण आहोत, उद्या नाही राहणार परंतु प्रकृती किंवा निसर्ग सुरक्षित नाही राहणार तर आमची येणारी पिढीसाठी सुरक्षित राहणार काय? हे आपण का विसरतो. भारत एक असा देश आहे जिथे प्राकृतिक संपदा सर्वाधिक आहे इथे जल, जंगल,जमीन कोयला, खनिज संपत्ती, या मातीत आहे म्हणून आपण सर्वात जास्त भाग्यवान आहोत. जल, जंगल, जमीनचे महत्व कधीपर्यंत आहे जेव्हापर्यंत मातीत माती आहे, जेव्हा मातीत फ्लोरिंग होते तेव्हा पाणी कुठे साचेल याचा प्रश्न पडतो. अर्थात जी संपती आपल्याला मिळाली आहे त्याचा संरक्षण सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे.
प्राकृतिक संपदा केवळ सरकारची नाही तर भारतात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे.
त्या संपतीला विकत असताना सरकारला लोकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही, सरकार आपली मनमानी करत आहे.
सरकार सर्वांचा आहे सर्व नागरिकांचा कसं चांगला होईल हा विचार करणे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु आज माणसाचा प्रकृती बरोबर व निसर्गासोबत खूप वाईट कृत्य करतांना सरकार दिसत आहे. सरकार जंगलाचा नाश करत आहे. आदिवासी जंगलाला वाचवण्यासाठी संपूर्ण विश्वाचा कल्याणासाठी सरकार सोबत लढत आहे. आपले कामधंधे सोडून उपास पोटी दिवस रात्र स्त्री, पुरुष, वृध्द, छोटी मुलं, किशोर वयातील मुलं मुली सर्व सरकारला विनंती करत आहे की या जंगलाची कटाई थांबवा.. थांबवा.. आम्ही कुठं जाणार, आम्ही कुठं राहणार आमचा जीवन मरण या जंगलातच होऊ द्या आमचा जंगल आम्हाला द्या हा संघर्ष सुरू आहे. तो आदिवासी शिकला नाही आहे पण त्याला प्रकृतीचे संरक्षण काय ते समजते जर आदिवासी जिंकला तर संपूर्ण मानव जातीचा खरा कल्याण होणार आणि हरला तर सर्वनाश निश्चित आहे.
यात एक विचार मी करते की खरे शिक्षण घेणारे कोण ज्यांनी शिक्षण घेतलेच नाही त्यांना प्रकृतीचे महत्व माहित आहे आणि ज्यांनी शिकून खूप मोठे पदापर्यंत पोहोचले किंवा देशाचे धुरा सांभाळणाऱ्यासाठी राजनीतीमध्ये गेले यांना प्रकृतीचे संरक्षण समजले नाही. परंतु आदिवासी मात्र शिक्षण न घेऊन सुद्धा किती वर्षापासुन जल, जंगल, जमीनसाठी लढत आहे आणि लढतच राहणार.. …उलगुलान.. जारी है, जारी रहेगा जय आदिवासी…
प्रा. अनिता एस. धुर्वे
महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदुर रेल्वे
मो. नं. ९९२३६०७५५७

