श्री राम जन्म भूमी आयोध्या येथून आलेल्या पूजीत अक्षद कलशाचे चांदुर नगरीत चे आगमन…. घरोघरी वितरित करण्यात आली पूजीत अक्षद
MB NEWS चांदुर रेल्वे(अतुल उज्जेनकर):-श्री राम जन्म भूमी अयोध्या येथून आलेली पूजित अक्षद कलशाचे चांदुर शहरात आगमन झाले असून ह्या अक्षदा मेटे कॉलोनी,संताबाई यादव नगर ,गुरू कृपा कॉलोनी ,महालक्ष्मी नगर,महारुद्र नगर या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घराघरात दि. 08/01/2024 रोजी सायंकाळी 5:00 वाजता येत्या 22 तारखेला च्या आयोध्येत होणाऱ्या श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण अक्षद देऊन देण्यात आले.मेटे कॉलोनी आणि संताबाई यादव नगर परिसरातील महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या टाकून ह्या अक्षद कलशाचे मोठया भावभक्तीने स्वागत केले.अक्षद वितरणाचा हा कार्यक्रम श्री कृष्ण मंदिर येथून प्रारंभीत करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला परिसरातील अनेक राम भक्तांनी उपस्थिती दर्शिवली ह्या मध्ये मोठया प्रमाणात महिला व पुरुष मंडळींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अक्षद वितराणाची पार्श्वभूमी आणि महत्व तालुका संघचालक मनोज जी मिसाळ यांनी व्यक्त केली.आयोध्येमध्ये 22 तारखेला संपन्न होत असलेला हा सोहळा दिवाळी प्रमाणे घरोघरी दीप उजळून साजरा करण्याचा व वितरित केलेली अक्षद पूजा स्थळी श्री रामाला अर्पण करण्याचा संदेश अक्षद वितरित करताना देण्यात आला.अक्षद वितरनाच्या ह्या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ.स्वाती मेटे, डॉ. सुषमा खंडार, सौ.शुभांगी मेटे, संध्या ढगे,सौ. सुशीला ठाकूर,सौ.शिल्पा भैसे, सौ. शोभा कलंत्री, सौ. जयश्री मुंधडा, सौं सारिका मालखेडे, सौ. साधना मेटे, सौ. कडवे,सौ. भारूका, सौ.वैद्य, सौ. जाधव,विजय कलंत्री,बंडू भाऊ मुंदडा,हरीहरराव म्हसतकर ठवकर काका,सुभाष धाकूलकर, दिपक अग्रवाल, श्रीकांत चुटके ही मंडळी स्वयंफुर्तीने ह्या अभियानात सहभागी झाली होती.*

