सरस्वती नर्सिंग कॉलेज येथे जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

सरस्वती नर्सिंग कॉलेज येथे जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)धामणगाव रेल्वे:- सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे) यांच्या अंतर्गत जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम सरस्वती नर्सिंग कॉलेज येथे आयोजन कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या सामाजिक न्याय व विशेष विभाग अंतर्गत समतादूत सरोज आवारे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अंजली सुटे व रेश्मा मेश्राम शिक्षक वर्ग यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यांनी जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर भाषण व गाणे प्रस्तुत केले कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले समतादूत सरोज आवारे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या

जिजामाता ,सावित्री यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आजच्या सावित्रीने त्यांचे विचार आत्मसात करणे फार गरजेचे आहे तसेच युवा पिढीने आपले ध्येय गाठण्यासाठी स्वामी विवेकानंदन यांनी सांगितले मूलमंत्र जपणे गरजेचे आहे कार्यक्रमाला जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी जिजामाता यांची वेशभूषा उन्नती मेश्राम व सोनाक्षी उगले यांनी प्रदान केली व मी जिजामाता बोलते असे एकपात्री प्रयोग सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल पाटील व आभार प्रदर्शन तेजस्विनी हनवते यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य अंजली सुटे ,समतादूत सरोज आवारे, रक्षा मेश्राम व विद्यार्थिनी

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे