महिला महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

महिला महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

MB NEWS(चांदुर रेल्वे):- विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदुर रेल्वे, येथील राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभागाच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे पूजन व पुष्पहार घालून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सीमा जगताप तर प्रमुख पाहुणे प्रा. संजीव भुयार, डॉ. विजय कापसे, डॉ. प्रदीप दंदे तर प्रमुख मार्गदर्शक स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुषमा खंडार उपस्थित होत्या. डॉ. सुषमा खंडार यांनी मार्गदर्शनात स्त्री शिक्षणाचे महत्त्व तसेच स्त्रियांचे समाज घडविण्यात काय स्थान आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. सीमा जगताप यांनी अध्यक्षीय भाषणातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिता एस. धुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रश्मी खेडकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा. मृणाली वानखेडे, रेखा मेश्राम, रजणी वगवे यांनी प्रयत्न केले. तसेच कु. मोनिका लाकडे बी. ए. प्रथम हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून मी सावित्री या विषयावर एकपात्री अभिनय सादर केले. या कार्यक्रमास विदयार्थिनींचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे