श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे तालुका स्तरीय संस्थान-विश्वस्त सभा संपन्न

श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे तालुका स्तरीय संस्थान-विश्वस्त सभा संपन्न

MB NEWS ( चांदुर रेल्वे):-अमरावती जिल्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे सांस्कृतिक भवन मध्ये दि.२० जानेवारी २०२४ रोजी अमरावती येथे आयोजित महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन (अमरावती-विदर्भ प्रांत) अनुषंगाने चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील संस्थान ,देवस्थान ,मंदिराचे विश्वस्त यांची सभा दि.१५/१/२०२४ सोमवारला दुपारी १२.०० वाजता सभाध्यक्ष निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक,प्रमुख अतिथी अनुप जयस्वाल, महाराष्ट्र मंदिर महासंघ सदस्य, विशेष उपस्थिती कैलासकुमार पनपालिया, महाराष्ट्र मंदिर महासंघ अमरावती जिल्हा निमंत्रक यांचे उपस्थितीत संपन्न झाली. या सभेची सुरुवात सावंगपूर नगरीतील परम पूज्य श्री कृष्णाजी महाराज यांच्या फोटोचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली.

या सभेत संस्थान संबंधित समस्या या महत्त्वाचे विषयाची पार्श्वभूमी कैलास कुमार पनपालिया यांनी समजावून दिली. संस्थान संबंधित येणाऱ्या सर्व न्यायालयीन अडचणीचे कायदेशीर मार्गदर्शन ॲड. अनुप जयस्वाल यांनी केले. संस्थानचे सरकारीकरण यांची सांख्यिकीय, संस्थानचे व्यवस्थापन, रूढी परंपरा, धार्मिक उत्सव, सभोवतालचा परिसर, संस्थानचे गावात येणाऱ्या भाविकांसाठी शासनातर्फे सर्व अत्यावश्यक सुविधा आणि कार्यपद्धती याबाबतचे सखोल आणि परिपूर्ण मार्गदर्शन निलेश टवलारे यांनी अध्यक्षीय भाषणात केले. या सभेला संस्थानचे सचिव गोविंद राठोड सर्व विश्वस्त विनायक पाटील, अशोक सोनवाल, दिगांबर राठोड, पुंजाराम नेमाडे,अनिल बेलसरे, चरणदास कांडलकर, वैभव मानकर,स्वप्निल चौधरी यांची उपस्थिती होती. या सभेची भोजन व्यवस्था संस्थानचे नुतन प्रसादालयात नियोजनबद्ध पद्धतीने संस्थानचे विश्वस्त फुलसिंग राठोड यांनी केली. सभेचे प्रास्ताविक संस्थानचे विश्वस्त पुंजाराम नेमाडे आणि आभार प्रदर्शन संस्थानचे विश्वस्त अशोक सोनवाल यांनी केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे