भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रविराज देशमुख मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रविराज देशमुख मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम

रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा; रविराज देशमुख यांचे प्रतिपादन

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र):-अमरावती दिनांक १५ जानेवारी: ”जनसामान्यांची रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अमरावती जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या रविराज देशमुख मित्रपरिवाराच्या वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निशुल्क महाआरोग्य रोगनिदान व रक्तदान शिबिर दिनांक १४ जानेवारी रोजी भक्त भवन , बस स्टँड, वाठोडा शु. ता. भातकुली जिल्हा अमरावती येथे संपन्न झाले. ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख मित्रपरिवार तसेच भाजपा ओबीसी मोर्चा तिवसा विधानसभा, महाराष्ट्र ग्राम दर्पण, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर आणि जीवन आधार बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात विविध ठिकाणी या निशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक १३ जानेवारी रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाढदिवस संपन्न झाला, त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यात सर्वप्रथम एवढ्या भव्य स्वरूपात जनसामान्यांची रुग्णसेवा करून हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विविध रोगांपासून सुटका मिळविण्यासाठी आरोग्य संजीवनी प्रमाणे गरजूंच्या आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा निपटारा या शिबिरामध्ये करण्यात आल्या. ज्यामध्ये मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, न्यूरोलॉजी, शल्यचिकित्सक, नाक-कान-घसा, मेंदू शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जन), किडनी रोग तज्ञ, हृदय रोग चिकित्सक अशा विविध रोगावरील तब्बल ७० तज्ञ डॉक्टरांची टीम या शिबिरामध्ये सहभागी होती. शिबिराची विशेष वैशिष्ट्ये म्हणजे रक्तदाब व मधुमेह तपासणी आणि शिबीर स्थळावर उपलब्ध औषधेच मोफत वितरण यावेळी करण्यात आले. तसेच शिबीर स्थळावरून रुग्णालयात जाण्याकरिता वाहनांची सुद्धा मोफत सुविधा देण्यात आली होती. रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान सुद्धा केले. शिबिराचे उदघाटन कामनापुर चे सरपंच मनोज काळमेघ व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी रविराज देशमुख व मित्र परिवारातर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सत्कारमूर्ती चा सत्कारही करण्यात आला, यावेळी प्रमुख उपस्थिती जीवन जवनजाळ, प्रदीप ठोसर, किसान मोर्चा तालुका सरचिटणीस उमेश गावंडे, अमित बाभुळकर, विनोद निमकार, अपंग सेल अध्यक्ष दिपक वाठोडकर, पत्रकार गजानन खोपे, मनोज खवड, संदिप कोंड, सचिन इगळे, गिरिष तेलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिवसा मतदार संघातील तसेच आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून हजारो रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली असून अनेक रुग्णांना शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे रवाना सुद्धा करण्यात आले आहे. एवढेच नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या रुग्णांना अधिक तपासण्या करणे आवश्यक असल्यास त्या सर्व तपासण्या सुद्धा चांगल्या हॉस्पिटल मध्ये करण्याची जबाबदारी रविराज देशमुख मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आली आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रविराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाढदिवस रुग्णसेवा करून साजरा केला: रविराज देशमुख
या शिबिरामध्ये ज्या नागरिकांनी आपली तपासणी केली व ज्यांना सर्व रुग्णांवर मोफत उपचार मिळाले, व अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना सुध्दा करण्यात आले आहे. तसेच ज्यांनी रक्तदान केले, त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू सुद्धा वितरित करण्यात आल्या. आरोग्य सेवेचा वसा घेत रविराज देशमुख मित्र परिवाराने जिल्हा भरात विविध ठिकाणी निशुल्क महारोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसाच्या पर्वावर रुग्णसेवा करून वाढदिवस साजरा केला, व जनसामान्यांचा आशीर्वाद हाच आमचा साथ असे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे