नाव – नीलेश दादारव वानखडे 96049 14185 रा. नयावाठोडा, तालुका – मोर्शी, जिल्हा – अमरावती सोयाबीन शेतीत तज्ञांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे.

नाव – नीलेश दादारव वानखडे 96049 14185
रा. नयावाठोडा, तालुका – मोर्शी, जिल्हा – अमरावती सोयाबीन शेतीत तज्ञांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे.

शेतकऱ्याच्या मेहनतीला ज्ञानाची जोड असली कि त्याच्या मेहनतीला फळ मिळतेच. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेले २००० लोकसंख्या असलेले नयावाठोडा हे एक गाव. याच गावामध्ये श्री. नीलेश दादारव वानखडे हा होतकरू तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याच्या कुटुंबामध्ये 4 आहेत. आणि आपल्याच शेतावर सर्व काम करणारे आहेत.
श्री. नीलेश दादारव वानखडे यांच्याकडे ५ एकर ओलिताची शेती आहे. शेती हि गावापासून थोड्याच अंतरावर आहे त्यामध्ये त्यांनी ओलिताच्या सोयीसाठी विहीर करून घेतली आहेत. श्री. नीलेश दादारव वानखडे सांगतात कि आधी सर्व शेती त्यांचे वडील हेच बघत असत आणि आधी तीच पारंपारिक पद्धतीने पिके ते घेत असत. परंतु पारंपरिक पद्धतीने शेती करत असतांना उत्पन्न पाहिजे जेवढे मिळत नाही असे नीलेश यांच्या लक्षात आले.
मागील २ वर्षापासून सतत रिलायंस फौंडेशन च्या संपर्कात राहून तसेच ते रिलायन्स फौंडेशन महिती सेवा अमरावती च्या व्हाटसप गृप मध्ये 2 वर्षापासून आहे तसेच त्यांना त्यांच्या मोबाइल वर रोज शेतीविषयक सल्ला सुद्धा मिळत असतो व रिलायन्स फाऊंडेशन टोल फ्री क्रमांक 18004198800 च्या माध्यमातून त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन तज्ञांकडून मिळाले. यामध्ये विविध पिकांविषयी माहिती दिली जाते. हा सल्ला नीलेश हे नियमितपणे ऐकतात असे ते सांगतात. यातूनच त्यांना सोयाबीन पिकाविषयी माहिती मिळाली व त्याविषयी अधिक माहिती त्यांनी मिळविली व आपल्या शेतामध्ये ३ एकर शेतावर त्यांनी सोयाबीन पिक लावण्याचे ठरविले. त्यानंतर जमीनिची चांगली मशागत करून त्यांनी आपले शेत तयार केले व त्यांनी 16 जून 202३ ला ३ एकर शेतीमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली. त्यासाठी त्यांनी रुचि जातीचे बियाणे निवडले. यावेळी पेरणी करतांना त्यांनी पट्टा पद्धतीचा अवलंब केला होता आणि सुरुवातीपासूनच त्यांनी कीड व रोग नियंत्रणासाठी कंगंध सापळे, निंबोळी अर्काची फवारणी आणि इतर रासायनिक कीटक नाशकांची फवारणी सल्ले नुसरच केली. त्यामुळे त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला असे ते सांगतात. कारण यावर्षी वातावरणामुळे बर्‍याच प्रमाणात सोयाबीन पीक खराब झाले होते. अशामध्ये सुद्धा योग्यप्रकारच्या नियोजनामुळे नीलेश वानखडे यांचे सोयाबीन पीक चांगले आले. या पिकाचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी ते रिलायन्स फौंडेशन महिती सेवा अमरावती च्या व्हाटसप गृप मधून तज्ञांचे मार्गदर्शन घेत असत.
पारंपारिक पिक पद्धतीमधून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिकतेची जोड देणे महत्वाचे आहे. हेच तंत्र नीलेश वानखडे यांनी वापरून आपले सोयाबीन पिकाचे शेत अतिशय सुंदर बहरले होते. पिकला खते व्यवस्थापन व कीड रोग व्यवस्थापन या संदर्भातल्या महितीचा वापर करत राहिले. त्यामुळे पिकला योग्य वेळी पाहिजे त्याप्रमाणात अन्नद्रव्ये व किडीवर नियंत्रण करत गेले. नीलेश वानखडे सांगतात कि त्यांना त्याच्या तीन एकर सोयाबीन पिकासाठी शेतीची मशागत करण्यासाठी 8 हजार, बियाणे विकत घेण्यासाठी 12 हजार, पेरणी डवरणी, कोळपणी यासाठी 12 हजार खते व औषधे यासाठी 16 हजार तसेच काढणीसाठी 8 हजार रुपये असा एकूण 56 हजार रुपये एवढा उत्पादन खर्च आला आहे. त्यांच्या 3 एकर शेतामध्ये त्यांना 30 क्विंटल सोयाबीन चे उत्पन्न मिळाले असे ते सांगतात. सोयाबीनची विक्री करतांना त्यांनी 40 क्विंटल सोयाबीन बाजारात विकले त्याला त्यांना 5200 रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला. त्यामधून त्यांना 156000 रुपायचे उत्पन्न झाले आहे. त्यांना आलेला उत्पादन खर्च 56 हजार वजा जाता 1 लाख रुपये निव्वळ नफा झाला. म्हणजेच तीन एकर मध्ये त्यांना 1 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. अशाप्रकारे आपल्या जिद्द व मेहनतीच्या भरवशावर नीलेश वानखडे यांनी आपली सोयाबीन पिकाची शेती फुलवली आहे.
नीलेश वानखडे सांगतात की शेती करत असतांना ते रिलायन्स फाउंडेशन कडून मिळालेल्या महितीचा चांगल्याप्रकारे उपयोग करून घेतात. त्यांच्या शेतामधील पिकाचे संपूर्ण नियोजन ते सध्या तज्ञांच्या सल्ल्यानुसारच करत करतात असे ते सांगतात. रिलायन्स फौंडेशन कडून मिळणारी माहिती त्यांना खूप मोलाची ठरते असे ते सांगतात. आणि यासाठी ते रिलायन्स फौंडेशन ला धन्यवाद देतात.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे