विद्याविहार विद्यालय शेंदुर्जना बाजार येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विद्याविहार विद्यालय शेंदुर्जना बाजार येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

(विद्यार्थ्यांनी कलगुनानी पडली प्रेक्षकांच्या मनाला भुरळ)

MB NEWS :-तळेगाव ठाकूर (सुनिल घोरमाडे):-विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शालेय शिक्षणावर विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा यासाठी विद्या विहार विद्यालय शेंदुर्जना बाजार च्या वतीने सांस्कृतिक स्नेहसंमेलन तसेच आनंदबाजार, रांगोळी स्पर्धा आयोजन २५ जानेवारी ते २७ जानेवारी २०२४ यांचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमांमध्ये स्नेहसंमेलन सोहळ्याच्या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सामाजिक समस्यांवर आधारित सांस्कृतिक कार्य कलाकृती सादर केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मराठमोळी लावणी तसेच समस्यांवर आधारित नाटिका अंधश्रद्धानिर्मूलन ,.प्रदूषण इत्यादी विषयावर उत्कृष्ट कलाकृती सादर केले .प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्कृस्ट गुण मिळाल्या बद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांना आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता. त्यांना बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी आणलेले विविध पाककलाकृती या ठिकाणी मांडण्यात आला होता. बाजार अतिशय चांगल्याप्रकारे सजवण्यात आला .सजवलेल्या आनंद बाजारामध्ये या ठिकाणी विविध पाककलाकृती यांचा विकत घेणे आणि विक्री याविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या .विद्यार्थ्यांनी आनंद बाजारामध्ये आलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन बाजाराचे महत्त्व जाणून घेतले .आनंद बाजाराची जबाबदारी शाळेचे शिक्षक शरद पवार आणि देवेंद्र भुरे सर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी अतिशय सुंदर रित्या कार्यक्रमाचे नियोजन केले आनंद बाजार सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव नरेंद्र उर्फ भैयासांहेब ठाकूर होते. कार्यक्रमाचे उद्घाटक विजयकुमार जाजू सहसचिव मस्तराम बाबा शिक्षण संस्था होते.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे ही प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे असे मत याप्रसंगी शाळेचे सचिव नरेंद्र उर्फ भैयासाहेब ठाकूर सर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होतो असे मत यांनी याप्रसंगी मांडलेत .आनंद बाजार बरोबरच विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना वाव मिळावा यासाठी या ठिकाणी आनंद बाजार बरोबर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये विविध कलाकृती सादर करून तसेच ज्वलंत प्रश्नांना रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. रांगोळी स्पर्धेत ची जबाबदारी विद्यालयाच्या शिक्षिका दिक्षीता केने यांनी स्वीकारली होती .रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शाळांनी करावे असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल भारती सर यांनी व्यक्त केले होते. सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि विविध प्रकारच्या बक्षीस वितरण यांची आणि प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचे स्वागत या ठिकाणी करण्यात आला. भैय्यासाहेब ठाकूर सचिव मस्ताराम बाबा शिक्षण संस्था विजयकुमार जाजु,शैलेश ठाकूर ,आशाताई चौधरी सरपंच शेंदुर्जना बाजार, एस एम ढोके माजी मुख्याध्यापक विद्या विहार विद्यालय,सुनील गवळी मुख्याध्यापक जी प मुलांची शाळा ,अशोकराव भारती ,आर एल मोहुतुरे,सौ देशमुख मॅडम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल भारती सर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र भुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक शरद पवार यांनी केले कार्यक्रमाचे संपूर्ण जबाबदारी शरद पवार ,देवेंद्र भुरे,दीक्षिता केने, ऋतिक पांडव ,कौशल गोंडचर , गजानन शितळे ,श्रावण बनकर . आदींनी प्रयत्न केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे