एस टी बसच्या मागील चाकात येऊन दोन ठार तर दोन जखमी
MB NEWS (चांदूर रेल्वे) :- चांदूर रेल्वे शहरापासून 8 किमी अंतरावर आहे. अमरावती रोडवरील मच्छली तलावाजवळ बसच्या मागील चाकात येऊन मुलाचा व वडिलांचा या दोघांचा मृत्यू झाला तर आई
आणि मुलगी दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू मोरेशोर महादेव रेवत्तर (वय 34) हे आपल्या कुटुंबासह चांदूरहून अमरावतीकडे आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच 32, एयू 9075 वरून जात असताना विरुद्ध दिशेने येणारी महामंडळ बस क्रमांक एमएच 40 एन, 8965 ही मोटारसायकल बसच्या मागील चाकात येऊन या अपघातात दुचाकीस्वार मोरेश्वर महादेव रेवतकर वय 34 व त्यांचा 5 वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर पत्नी सविता मोरेश्वर ही तीन वर्षाची मुलगी जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आली.पुढील तपास चांदूर हे करीत आहेत. हेडकॉन्स्टेबल शिवाजी घुगे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे पोलिसांनी केली.

