योग्य व्यवस्थापनातून कपाशीचे भरगोस उत्पन्न.

योग्य व्यवस्थापनातून कपाशीचे भरगोस उत्पन्न.

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी विविध पीक घेतात. त्यामध्ये कापूस, तूर, ज्वारी, संत्रा,सोयाबीन इत्यादि मुख्य पिके आहेत. अशी पिके घेत असताना येथील शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात व कमी खर्चात भरघोस उत्पादन कसे घ्यावे याचे अचूकपणे व योग्यवेळी मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अचूक माहिती अभावी शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना कष्ट व उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफा होत नाही. पण चिंचोली शिंगणे ता.अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती येथील कापूस उत्पादक शेतकरी श्री. राजेश भरतराव ठाकरे या तरुण शेतकऱ्यांने रिलायन्स फौंडेशन च्या १८००४१९८८०० या टोल फ्री व व्हाट्स अप सेवांच्या माध्यमातून मिळणार्‍या मार्गदर्शनामुळे कपासाचे भरगोस उत्पन्न मिळवले आहे.
श्री. राजेश भरतराव ठाकरे आपल्या कुटुंबासोबत चिंचोली शिंगणे ता.अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती येथे राहतात. या ठिकाणी त्यांची वडीलोपार्जित 2 एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीत सोयाबीन,कपासी, तूर ही प्रमुख पिके घेतात. राजेशभाऊ यांचे शिक्षण १२ वी झाले आहे. राजेशभाऊ ठाकरे हे आधी शेती पारंपरिक पद्धतीने म्हणजे वडील पूर्वी ज्या पद्धतीने शेती करत होते त्या पद्धतीने शेती करत होते. त्यामुळे त्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान माहिती नव्हती. मशागत, पिकाच्या दोन ओळींमधील अंतर, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग यांचे नियंत्रण, माती परीक्षण अशा बऱ्याच गोष्टीची त्यांना माहिती मिळतच नव्हती. या भागामध्ये पावसाच्या आभावामुळे शेतीमध्ये अपेक्षित उत्पन्न मिळवणे तसे कठीणच काम आहे. त्यामुळे राजेशभाऊ ठाकरे यांचा सुद्धा खर्चाचा व उत्पादनाचा ताळमेळ बसत नव्हता.

परंतु पिकावरती कोणती कीड किंवा रोग पडला तर जे औषध कृषि सेवा केंद्र दुकानदार देत होते त्याची फवारणी करत होते. ती औषधे खूप महागडी पडतात. रासायनिक खत अति जास्त वापरत असल्याने जमिनीचा कस कमी होत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे उत्पादन वर्ष दर वर्षी कमी होत होते परंतु उत्पादन खर्चात वाढ होत होती आणि उत्पादनही त्या पटीत मिळत नव्हते. शेतीविषयक योग्य सल्ला मिळत नव्हता. रिलायन्स फौंडेशनचे मार्गदर्शन मिळण्याअगोदर नवीन तंत्रज्ञानाची तसेच बाजारातील तयार खते वापरण्या पेक्षा जमिनीची आवश्यकता ओळखून खत कशापद्धतीने टाकावी याची माहिती शेतात काम करताना मिळत नव्हती. त्यामुळे त्याना शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफा होत नव्हता.त्यामुळे शेती करावी की नाही असेच राजेशभाऊ ठाकरे यांना वाटत होते.

राजेशभाऊ ठाकरे यांना रिलायन्स फौंडेशनच्या टोल फ्री क्रमांकाची माहिती मिळाली. २०१९ पासून ते टोल फ्री क्रमांकावर फोन करून पीक व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती मिळवत आहे. तसेच पिकासाठी अवश्यक असणार्‍या व रासायनिक खत हे नत्र,स्फुरद, पालश, या घटकामध्ये कशा पद्धतीने दिले पाहिजे याची माहिती मिळवली व पिकाला खते देताना पिकानुसार व आवश्यकतेनुसार खते कशी द्यावीत याविषयी योग्य माहिती मिळाली. तसेच हवामानाचा अंदाज टोल फ्री क्रमांकावरून माहिती वेळोवेळी मिळवली. रिलायन्स फौन्डेशनच्या टोल फ्री १८००४१९८८०० या नंबरचा योग्यवेळी फोन करून माहिती त्यांना वेळोवेळी मिळाली. या शेतीविषयक माहितीचा वापर शेतात त्यांनी वेळो वेळी करून घेतला आहे. या माहितीच्या आधारेच राजेशभाऊ ठाकरे यांनी शेतात खतांचा, बियाण्याचा व औषधांचा वापर केला. योग्य माहिती योग्य वेळी मिळाल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. पिकच्या योग्य व्यवस्थापनामधून कपाशी चे चांगले उत्पन्न घेता येईल व खताच्या योग्य व्यवस्थापनामधून खताच्या प्रत्येक डोस मागे एकरी 500 रुपये पर्यन्त वाचता आले आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे उत्पादनात २०% ते ३०% फरक पडला व खर्चात बचत झाली.

पूर्वी राजेशभाऊ ठाकरे यांना कपाशी पिकाच्या उत्पादनाचा खर्च एकरी ३५,००० एवढा खर्च होत होता .रिलायन्स फौंडेशनची माहिती मिळाल्यानंतर होणारा उत्पादनाचा खर्चात बचत होऊन तो फक्त २५,००० ते २७,००० रुपये आला.पूर्वीचे कपाशी चे उत्पन्न एकरी ६ क्विंटल होत होते. राजेशभाऊ ठाकरे यांना यावर्षीचे कपासी चे एकरी उत्पन्न 11 क्विंटल म्हणजे जवळ जवळ दुप्पटीने वाढले आहे. त्यांना या वर्षी त्यांच्या एक एकर क्षेत्रामधून 11 क्विंटल कपाशीचे उत्पन्न झाले आहे. कपाशी च्या आजच्या भावाप्रमाणे म्हणजेच ६७०० प्रती क्विंटल प्रमाणे ७३ हजार ७०० रुपयाचे उत्पन्न झाले आहे. तसेच कपाशी मधील तूर पिकामधून त्यांना यावर्षी २ क्विंटल तुरीचे उत्पन्न मिळणार आहे. तुरीचा सध्याचा भाव १०,४०० याप्रमाणे २०,८०० म्हणजे कपासी व तूर मिळून ९४ हजार ५०० रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी त्यांना फक्त २७००० हजार रुपये एकूण खर्च आला आहे. रिलायन्स फाउंडेशनकडून मिळणार्‍या महितीमुळे त्यांचा उत्पादनात जवळ जवळ दुप्पटीने वाढ झाली झाली आहे असे ते सांगतात.

रिलायन्स फौडेशनकडून शेतकर्‍यांच्या बांधा पर्यन्त शेती तंत्रज्ञान आणले त्याचा शेतकर्यांयना चांगला फायदा होत आहे. सर्व माहिती घर बसल्या मिळून जाते. त्यासाठी कोणतीही फी शेतकर्‍यांकडून घेतली जात नाही. योग्य तीच माहीत योग्य वेळी दिली जाते. याचा शेतकर्‍यानी फायदा घ्यावा. तसेच कमी खर्चात उत्पादन चांगले मिळावे. रिलायन्स फौंडेशनच्या १८००४१९८८०० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून शेतीत नफा झाला आहे. त्यामुळे या सेवेचा मी प्रथम आभारी आहे. तसेच माझ्या प्रमाणे इतर शेतकर्‍यांनी सुध्दा या सेवेचा लाभ घेऊन आपले शेतीचे उत्पादन वाढवावे असे राजेशभाऊ सांगतात.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे