इंडीया आघाडी व संयुक्त किसान मोर्चाचे वतीने तिवसा शहर कळकळीत बंद

इंडीया आघाडी व संयुक्त किसान मोर्चाचे वतीने तिवसा शहर कळकळीत बंद

MB NEWS (सुनिल घोरमाडे ) तिवसा :-इंडीया आघाडी व संयुक्त किसान मोर्चाचे वतीने संपुर्ण भारत बंद आंदोलनाचे अनुशंगाने अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहर कळकळीत बंद ठेवण्यात आला . या आंदोलनाची मुख्य मागणी देशाची लोकशाही वाचवा अशी आहे . शेतकऱ्यासाठी डॉ . स्वामीनाथन आयोग लागू करा,राशन व्यवस्था कायम ठेवा, शेतमजूरासाठी केंद्रीय कायदा लागू करा, महीला अत्याचाराला आळा घाला अशा अनेक मागण्या आजच्या बंदच्या आंदोलनात करुन प्रधानमंत्र्याचे नावे मा . तहसिलदार मार्फत निवेदन देण्यात आले . या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सर्वादी कम्युनीस्ट पक्षाचे जिल्हा कमेटी सदस्य कॉ . महादेव गारपवार, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रकात वडस्कर, प्रकाश सोनोने शेतमजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष दिलीप शापामोहन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विलास माहोरे , तालुका प्रमुख देवीदास निकाळजे, शेतमजूर युनियन जिल्हा सचिव पुंडलीक पापणकर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ . सुभाष तवर , अजय सूटकर , अजय गारपवार ,संजय गोरडे असे शेकडो कार्यकर्ते आजचे आंदोलनात सहभागी होते . आंदोलनाचा शेवट जूना नगरपंचायत कार्यालया समोर जाहीर सभा घेण्यात आली या सभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व शिवसेना ( उध्दव ठाकरे ) या पक्षानी विचार मांडून मोदी सरकारवर टीका केली .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे