घासातला घास या अभियान अंतर्गत नवी मुंबईत शालेय वस्तू वाटप कार्यक्रम संपन्न .. परिवर्तन ट्रस्ट चा उपक्रम
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र) संजु पाटील :-कोपरखैरणे नवी मुंबई येथे छ. शिवाजी महाराज जयंती निमीत्त अनाथ व एकल पालक विद्यार्थी यांना शालेय वस्तू वाटप कार्यक्रम आयोजीत केला .शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पॅड कंपास वह्या इत्यादी साहित्य त्यांच्या गरजेनुसार वाटप करण्यात आले या साहित्य वाटप कार्यक्रम साठी सीनियर पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पीएसआय टेकनर साहेब. यांनी वस्तुरूपाने मदत करून या गरीब व गरजू मुलांसाठी खूप मोठा हातभार लावला. ऐन परीक्षेच्या काळात त् शालेय वस्तू मिळाल्याने मुलं खूप आनंदित झाली.तसेच या कार्यक्रम प्रसंगी अशा छान वस्तुचे वाटप झाल्याचे बघून काही पालकांना रडू आवरलं नाही. अशा प्रकारे एक शालेय वस्तू वाटप चा सुंदर कार्यक्रम परिवर्तन ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाला परिवर्तन ट्रस्टचे संस्थापक प्रा. दत्ता हेगडे घणसोलीतील प्रसिद्ध डॉक्टर धवणे,
उप प्राचार्य अविनाश सर ,वरिष्ठ पत्रकार जे के पोळ , विचारवंत द.वी चंदनशिवे, बेस्ट कामगार युनियनचे अध्यक्ष संजय गायकवाड, विनोद धुरंदर, ज्योती मॅडम, जिजामाता सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव गर्जे , नवनाथ देशमुख,सिद्धार्थ ठोकळे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक महिला पालक विद्यार्थी त्यांचे नातेवाईक व परिवर्तन ग्रुपचे सदस्य, व हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिवर्तन ग्रुपचे राजू माने, डी आर शिंदे, अजिंक्य मोहिते, ओंकार मस्कर, सिद्धार्थ ठोकळे ,यांनी सहकार्य केले.आयोजन परिवर्तन एज्युकेशन सोसायटी /परिवर्तन ट्रस्ट नवी मुंबई. यांनी हा कार्यक्रम पंचशील बुद्ध विहार हॉल सेक्टर 4ए.
शेतकरी हॉल व कोपरखैरणे येथे केले ..कार्यक्रम संपल्यावर शिवजयंती निमित्त जिलेबी अल्पोपहार देण्यात आला.

