मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा उपक्रमात पु.संत गाडगेबाबा विद्यालय तालुक्यात प्रथम स्थानी.
MB NEWS (अतुल उज्जेनकर)प्रतिनिधी :-“मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा” हे अभियान राज्यभर राबविण्यात आले होते.यामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करिता हे अभियान राबवण्याचे शासनाने निर्देशित केले होते.त्यानुसार पूज्यनीय संत गाडगेबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांजरखेड (कसबा) तालुका चांदुर रेल्वे येथे ” माझी शाळा-सुंदर शाळा” हे अभियान राबविले.
अभियानानंतर केंद्रस्तरावरील समितीने विद्यालयाचे संपूर्ण उपक्रमाला अनुसरून मूल्यांकन केले. त्यामध्ये निवड समिती व केंद्र समितीने तारखेनुसार विद्यालयाचे मूल्यांकन केले. विद्यालयाची फाईल तपासणी व निरीक्षण केले.यामध्ये समितीने विद्यालयाचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याचे घोषित करण्यात आले.
“मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा” या अभियान उपक्रमात 45 दिवस् विद्यालयाचे वर्ग 5 ते 12 वी चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.तसेच विद्यालयाचे संस्थापक/सचिव आदरणीय प्राध्यापक बी.आय.इंगळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
या अभियानात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्या बददल चतुराजी बहुउद्देशिय शिक्षण संस्था अमरावती चे संस्थापक/सचिव आदरणीय प्राध्यापक बी. आय इंगळे त्याचप्रमाणे संस्थेच्या च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक/प्राचार्य श्री.यु.आर ढगे यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक श्री.पी.के सरदार विद्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षक श्री.के.आर डोंगरे, श्री.एस.डब्ल्यू.धोटे,श्री.पी.एस.राऊत,श्री.ए.बी.शिरपूरकर,श्री.टी.बी.पठाण,श्री.एन.एच.मडघे,श्री.एम.बी.महाजन,
श्री.आर.एम.मनवर, , श्री.व्ही.व्ही.रोटे.विद्यालयातील शिक्षक श्री.डी.के.पवार श्री.ए.एन.बोरकर,श्री.जे.एस.माळोदे,श्री.एस.सी. सूर्यवंशी,श्री.एच.बी.यावले,श्री.सी.डी.काळे विद्यालयातील शिक्षिका सौ.साधना भ. इंगळे,श्रीमती व्ही. डी.इंगळे,,कु.एम.आर.इंगळे ,कु.जी.आर.भांडे, कु.एस.आर.डोंगरे तसेच विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्रीआर.व्ही. वानखडे,श्री.पी.जी.दामले,श्री बी.बी.इंगळे,श्री. व्ही.एस.नेवारे,श्री.पी.एन.कोराटे,श्री अक्षय पळसपगार यांनी उपक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले व या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्याना सहभागी करून घेतले व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

