जबलपूर एक्सप्रेस पाठोपाठ,शालीमार एक्सप्रेसचा चा ही चांदूर रेल्वे स्टेशनवर थांबा अखेर मंजुर, आमदार प्रताप अडसड सोबत खासदार रामदास तडस यानी केला पाठपुरवठा आणि चांदुर रेल्वे येथील रेल रोको कृती समितीच्या तपश्यर्याची ची फलश्रुती
MB NEWS (चांदुर रेल्वे )अतुल उज्जेनकर प्रतिनिधी :-चांदुर रेल्वे रेल् रोको कृती समिती तर्फे पुकारलेल्या बहूचार्चित आंदोलनाला मिळालेल्या चांदुर रेल्वे स्टेशन येथे मिळालेल्या जबलपूर एक्सप्रेस च्या मिळालेल्या थांब्या पाठोपाठ आज शालिमार एक्सप्रेस चाही थांबा अखेर मिळाला.खा. रामदासजी तडस यांच्या यशस्वी पाठपुराव्याने मिळालेल्या ह्या यशाबदल रेल रोको कृती समितीने आभार मानले.
रेल्वेचा थांबा हा राजकीय विषय नसून चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा विषय होता आणि त्याच अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करून खासदार रामदासजी तडस यांच्या माध्यमातून हा थांबा पूर्ववत करण्यात यशस्वी झालो सोबतच ना.श्री.अश्विनीजी कुमार रेल्वेमंत्री भारत सरकार यांचेही आभार मानतो प्रतिपादन धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी केले.

