वीज समस्येची कोणत्याही समस्येचे निवारण करण्यासाठी अधिकारी – वायरमन अनावश्यक पैसे मागतायेत? ‘या’ नंबरवर करा तक्रार, लगेच होईल कार्यवाही
गाव-खेडे असो किंवा शहरी भाग, प्रत्येक ठिकाणी विजेच्या काही ना काही समस्या या उद्भवत असतातच. तसेच, सामान्य नागरिकांच्या बाबतही वीज संबंधित अनेक प्रश्न किंवा अडचणी असतात. या छोट्या मोठ्या अडचणींसाठी अज्ञानामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे सामान्यांना बरीच मोठी किंमत मोजावी लागते.
काहीवेळा मुजोर अधिकारी किंवा वायरमन अथवा वीज कर्मचारी बेसुमार पैशांची मागणी करतात, त्यातून सामान्यांची पिळवणूक होते. परंतू, आता सामान्यांची हि पिळवणूक थांबावी, यासाठी महावितरण कडून ऑनलाईन तक्रारीची तसेच फोन कॉल तक्रारीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
विजेची कोणतीही समस्या असो ऑनलाईन करा तक्रार –*
जर, तुम्हाला नवीन वीज जोडणी करायची असेल, वीज बिलावरील नावात बदल किंवा दुरुस्ती करायची असेल तसेच, आधार- मोबाईल-ईमेल लिंक करायची असेल, अथवा अधिकारी-वायरमन पैसे मागत असेल, तर अशा कोणत्याही स्वरुपाची तक्रार ऑनलाईन करता येऊ शकते. तसेच स्थानिक पातळीवरील विजेची कोणतीही समस्या असल्यास ऑनलाईन तक्रार करता येईल. तसेच यासाठी टोल फ्री क्रमांकावर फोनही करता येऊ शकतो.
*तक्रार करण्यासाठी क्रमांक –* 1912 / 18002333435

