अचलपूरसह मेळघाटच्या विकासासाठी कटिबद्ध बळवंत वानखडे,अचलपूरच्या जाहीर सभेत बळवंत वानखडे यांचा झंजावात

अचलपूरसह मेळघाटच्या विकासासाठी कटिबद्ध बळवंत वानखडे,अचलपूरच्या जाहीर सभेत बळवंत वानखडे यांचा झंजावात

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)अमरावती:-
विकासापासून कोसो दूर असलेल्या लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असून अचलपूरसह मेळघाट मध्ये खऱ्या अर्थाने विकास कसा करायचा त्याच्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी दिले

30 मार्च रोजी रोजी अचलपूर येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या जाहीर सभेला अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलु भाऊ देशमुख, माजी आमदार विरेद्र भाऊ जगताप, मन्नाभाऊ दारर्सिंभे,(महाराष्ट्र जन क्रांती सेना अध्यक्ष )दयाराम काळे, महेंद्र भाऊ गहरवाल , सहदेव बेलकर, राहुल येवले, रामभाऊ काळे नामदेवभाऊ तनपुरे, पंकज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांचे नाव जाहीर झाल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या नावाला व कार्याला पसंती मिळत आहे. अचलपूर येथील जाहीर सभेत मेळघाटातील आदिवासी बांधवांनी बळवंत वानखडे यांचे जल्लोषात स्वागत केले. विशेष म्हणजे अचल पूर्व मेळघाट परिसरातील युवावर्गाने वानखडे यांना भरगोस प्रतिसाद देत ‘पंजा’ येणारच असा ठाम विश्वास दर्शविला.
काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट,आप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांना पक्षाची तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी मेळघाट पासून मतदारांच्या भेटीगाठीला सुरुवात केली. त्यांनी सलग तीन दिवस मेळघाट परिसर पिंजून काढला.त्यांच्यासोबत संवाद साधला. अचलपूर येथील जाहीर सभेत वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख यांनी देखील विरोधकांचा चांगलाच समाचार घेत बळवंत वानखडे यांना विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.

खा. नवनीत राणा यांच्याविरोधात मेळघाटात प्रचंड रोष असून युवावर्गाने मेळघाटात पाच वर्षे कोणतेही विकास कामे झाली नसल्याचा दावा केला.आम्हाला मेळघाटात येऊन एन्जॉय करणारे लोकप्रतिनिधी नकोत तर काम करणारे लोकप्रतिनिधी हवेत असा सूर सुद्धा यावेळी युवावर्गासह अबालवृद्धांनी लावला.बळवंत वानखडे यांची साधी सरळ राहणी आणि कुठलेही काम करण्याची जिद्द येथील आदिवासी बांधवांना चांगलीच भावली.मेळघाटातील कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार युवकांशी संवाद साधून बळवंत वानखडे यांनी अचलपूर येथील जाहीर सभेत उपस्थितांचा विश्वास जिंकला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे