जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद..

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद..

नवीन भरती झालेल्यांना ‘या’ दिवशी नेमणुका तर पुढची नवीन भरती २० मे नंतर होणार

 ग्रामविकास विभागातर्फे काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आली होती. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येता आले नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्ती मिळू शकते. पण, आंतरजिल्हा बदलीची ही शेवटची प्रक्रिया असणार आहे. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत त्याच जिल्ह्यात काम करण्यास तयार असल्याचे लेखी द्यावे लागणार आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गावरील शिक्षक नव्याने निवड होऊन इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या वर्गांसाठी गेला तर त्यास बाहेरील जिल्ह्यात जाण्यास परवानगी असणार आहे. मात्र, एकदा भरती झालेला शिक्षक त्याच पदावर काही वर्षांनी पुन्हा स्वजिल्ह्यात जाणार नाही.

निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यावर भरतीला सुरवात*
राज्यातील जिल्हा परिषदांमधील जवळपास पाच हजार पदे तर खासगी अनुदानित संस्थांमधील पाच हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया *२० मेपासून* सुरू होईल. जाहीर झालेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सुरू करायला परवानगी मिळावी, अशी मागणी शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याला होकार मिळाल्यानंतर आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे  दरम्यान, मागील भरतीवेळी ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा नव्याने पुढच्या भरतीसाठी अर्ज करावा लागणार नाही.

🙏🏻 *कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा…*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे