तिवसा तालुक्यातील रेती घाटात नियमबाह्य कारभार.-वर्धा नदीच्या क्षार रेतीघाटात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.-8 ट्रक,2 पोकलॅन्ड सह 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त.
MB NEWS सुनिल घोरमाडे (ता प्र.)-: तालुक्यात अनेक रेतीघाट असून त्याचे आता नव्याने डेपोमध्ये रूपांतर झाले आहे.अश्या अनेक डेपो चालविण्यासाठी देण्यात आले असून त्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांना पायदळी तुडवून नियमबाह्य व मनमानी पद्धतीने वाळू डेपोचा कारभार सुरू असून त्यावर कुठल्याही अधिकाऱ्यांचा लगाम नसल्याचे चित्र सध्या तिवसा तालुक्यात सुरू आहे.असे असताना वर्धा नदीपात्रातील भारवाडी गावाजवळील परतोडी येथील क्षार घाटात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून अवैध रेतीसाठी घटनास्थळी असलेले 8 ट्रक,2 पोकलंड मशीन,2 ट्रॅकर, व अन्य साहित्य असा एकूण 1 कोटी 72 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 19 जणांवर तिवसा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सुनिल घोगरे (वय ४४ वर्ष, रा. वडरपुरा, अमरावती), मंगेश बरडे (वय २८ वर्ष, रा. शेंदरीपुरा, चादुर रेल्वे),पिरु मोहम्मद जानीवाले (वय ४० वर्ष, रा. कब्रस्थान, फ्रेजरपुरा, अमरावती), रामा चौधरी (वय ४५ वर्ष, रा. फ्रेजरपुरा, अमरावती) व अरशद अली आबीद अली (रा. फ्रेजरपुरा, अमरावती) व अधिक फरार १४ ईसम अश्या एकूण 19 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद सा. (भा.पो.से.), अमरावती ग्रामीण यांनी अमरावती ग्रामिण हद्दीत वाढत्या रेती चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शनात कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक . किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील चांदुर रेल्वे उपविभागातील पो.उप.नि. सागर हटवार यांचे पथक दिनांक ०४/०५/२०२४ रोजी पोस्टे तिवसा हद्दीत अवैध धंदयाचे उच्चाटन करण्यासाठी पेट्रोलॉग करीत असता गोपनिय माहिती मिळाली की, तिवसा हद्दीतील परतोंडी गावासमोरील वर्धा नदीचे पात्रात क्षार घाटात अरशद अली आबीद अली रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा, अमरावती हा शासनाकडून घाट रेती उत्खननासाठी खुला झाला नसतांना देखील विनापरवाना काही इसमांना हाताशी धरुन अर्वध्यरित्या पोकलैंडचे मदतीने नदीमध्ये उत्खनन करुन रेती ट्रकमध्ये विक्री करण्याचे उद्देशाने भरत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरुन पथकाने प्रथम क्षार घाटासमोरील ग्राम परतोडी येथे जावून नदीकाठावर जावून पाहणी केली असता पिवळया रंगाच्या पोकलैंड मशीनने वर्धा नदीचे पात्रात पश्चिम किना-यावर क्षार घाटात रेतीचे अवैध उत्खनन सुरू होते. व दुसऱ्या केशरी रंगाच्या पोकलैंड मशीनने रेती ट्रक मध्ये भरतांना दिसले व असे बरेच ट्रक एकामागे एक लाईन मध्ये लागलेले होते व घाटावर दोन ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये चाळण्या फिट करुन त्यामध्ये रेती गाळणीचे काम सुरू होते. सदर घाटाबाबत शहानिशा केली असता, नमूद क्षार घाट हा गट नं. ७ मध्ये येत असुन तो कोणासही वितरीत केला नसल्याचे खात्री झाल्याने पथकाने रेड कारवाई केली असता, ४ इसमांना त्यांचे नाव पत्ते विचारुन जागीच ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांना रेती वाहतुकीबाबत रॉयल्टी व परवाना बाबत मागणी केली असता कोणताही परवाना सादर केला नाही. नमूद ४ इसमांना घाट मालकाचे नाव विचारले असता त्यांनी अरशद अली आबीद अली रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा, अमरावती यांचे मालकीचा असल्याचे सांगीतले. सदर कारवाई दरम्यान एकुण आठ टूक किमंत ९६,००,०००/-, दोन ट्रॅक्टर किमंत अं. १६,००,०००/-, दोन पोकलैंड किमंत ६०,००,०००/-रु एक मोटार सायकल कि.अं. ५०,०००/-रु ,चार वेगवेगळया कंपनीचे मोबाईल कि अं.४०,०००/- रु असा एकूण १.७२,१०,०००/-रु चा
मुदेमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपीतांनी संगणमत करुन शासन नियमावलीचे उल्लंघन करून पर्यावरणास हानी पोहचवून अवैधरित्या विनापरवाना घाटा संदर्भात कोणताही मालकी हक्क अथवा रोयल्टी नसतांना शासनास कोणताही महसुल जमा न करता चोरटया मार्गाने रेतीचा उपसा व विक्रीकरीता वाहतुक करतांना मिळून आल्याने नमूद आरोपीतांविरुध्द पोस्टे तिवसा येथे कलम ३७९,१८८,१०९,३४ भादेवी सहकलम ९,१५ पर्यावरण संरक्षण अधिनियम, सहकलम ४८ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक . विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत सा.. अमरावती ग्रामीण, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा . किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. सागर हटवार, श्रेणी पोउपनि मूलचंद भांबुरकर, पोहेकों अमोल देशमुख, पोहेकों मंगेश लकडे, पोहेकों चंद्रशेखर खंडारे, नापोकों सचिन मसांगे, चालक पोहेको संजय प्रधान यांनी केली.

