पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचे 299 व्या जयंतीनिमित्त भव्य टू व्हीलर रॅली संपन्न
अहिल्या महिला परिषद व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच शाखा अमरावतीचे संयुक्त आयोजन
MB NEWS (राजु डांगे) :-स्थानिक अमरावती पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे 299 जयंती निमित्त,नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक विद्युत नगर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन माननीय आमदार सौ सुलभाताई संजयराव खोडके तसेच जेष्ठ समाजसेवक डॉ. गोविंद भाऊ कासट ,. वैद्यकीय अधीक्षक श्री पवन टेकाळे सर व माननीय नगरसेवक प्रशांत जी डवले व दोन्ही संघटनेचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त दनंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आयोजका तर्फे सौ विनिता ताई गादे श्री अशोक लव्हाले, व पदाधिकारी यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर टू व्हीलर रॅली सुलभाताई खोडकेॲड.दिलीप भाऊ एडतकर ,जेष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद भाऊ कासट, नगरसेवक प्रशांत जी डवरे, यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी या प्रसंगी थोडक्यात मार्गदर्शन केले व या अहिल्यादेवी चौकाचे अधिक सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचेही यावेळी व्यक्त केले.
या भव्य रॅलीचे विहंगम दृश्य अगदी कौतुकास्पद व अभिनंदनिय होते . रॅलीचे समोर घोड्यावर बसून अहिल्यादेवी ची वेशभूषा केलेली ,श्वेता पाटील अत्यंत सुंदरतेने त्यांनी अहिल्याची भूमिका याप्रसंगी वठवली, त्यामागे पिवळा फेटा व पिवळा साड्या परिधान केलेल्या ,पिवळा माहोल असे एकूणच वातावरणात टू व्हीलर वर अनेक महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या .त्यामागे पुरुषवर्ग व भरगच्च असे समाज बांधवांनी या रॅलीची मंगलता ,दिव्यता व रमनियाता अधिकच वाढवली .ही रॅली विद्युत नगर चौक शेगाव नाका, पंचवटी या मार्गाने मार्गक्रमण करत होती व अहिल्यादेवी ची गीत ,पोवाडा व गर्जनांनी अमरावती दुमदुमत होती .शेगाव नाका चौक येथे काही तरुण युवकांनी पुढाकार घेऊन या रॅलीस करिता अल्प उपहार चे आयोजन केले होते.
या रॅलीचा समारोपिय कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न, विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून समारोपिय कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.ऍड .दिलीप भाऊ एडतकर यांच्या अध्यक्षतेत तसेच प्रमुख मार्गदर्शक ,अतिथी माजी मंत्री श्री सुरेंद्र भुयार, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद भाऊ कासट व वैद्यकीय अधीक्षक श्री डॉ. टेकाळे सर व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिल्या महिला परिषदे च्यां अध्यक्ष सौ विनिता गादे तसेच महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन म्हणजे अध्यक्ष श्री अशोक लव्हाळे यांनी केले तदनंतर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंदभाऊ कासट यांनी रॅलीला उद्बबोधन, करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर माजी मंत्री सुरेंद्र भुयार सर यांनी अहिल्यादेवीचा जीवनपट थोडक्यात मांडला व रॅलीस शुभेच्छा दिल्या, यानंतर अत्यंत भारदस्त वाणीतून व अत्यंत दिशादर्शक असे अनमोल मार्गदर्शन दैनिक विदर्भ मतदार चे संपादक ऍड. दिलीप भाऊ एडतकर, लोकनेते यांनी केले.
आभार प्रदर्शन सचिव अहिल्या महिला परिषद सौ.नीता टेकाळे यांनी केले तर संचलन डॉ.राजू डांगे संस्थापक आहिल्या महिला परिषद यांनी केले यावेळी श्वेता पाटील यांनी अहिलेदेविची ची सुंदर भूमिका प्रस्तुत केल्याबद्दल व तलवारबाजीचा खेळ सादर केल्याबद्दल त्यांचे स्वागत व सत्कार ॲड. दिलीप भाऊ एडतकर यांनी केला यावेळी समाज बांधवांमध्ये एक उत्साह पूर्ण वातावरण दिसून येत होते अहिल्यादेवींच्या गर्जना, येळकोट येळकोट च्या गर्जनांनी वातावरण सर्वत्र दुमदुमत होते या कार्यक्रमाप्रसंगी अहिल्या महिला परिषदेच्या सर्व पदाधिकारी तसेच महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,शाखा अमरावतीचे पदाधिकारी अहिल्या महिला परिषदेचे संस्थापक डॉ सुधाकरराव काळमेघ, राजेंद्र मस्के, राजू डांगे तसेच महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच श्री अशोक लव्हाळे, सदाशिवराव गाडेकर सचिव, सचिन भाऊ शहाकार ,संतोष भाऊ साव, नंदकुमार टेकाळे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी तसेच संपूर्ण धनगर समाज बांधव यांच्या सहभागी झाले.
या रॅली करता अध्यक्ष, सौ विनिता गादे सचिव ,निता टेकाळे ,सहसचिव रेखाताई गावंडे कोषाध्यक्ष, कल्पनाताई ढोके सहकोषाअध्यक्ष रंजनाताई लांडे, प्रसिद्धी प्रमुख प्रतिभाताई उमेकर, उपाध्यक्ष शोभाताई काळमेघ ,वंदनाताई डांगे ,जयश्री शहाकार तसेच प्रणिता ताई कोल्हे ,योगिता गोहत्रे उपस्थित होते त्याचप्रमाणे सदस्य लीना ताई नवले सरलाताई ढवळे, नीताताई कवाने ,संगीता ताई लांबाडे , संध्या गंधे,मयुरी राऊत सर्व पूर्वअध्यक्ष साधनाताई मस्के ,मेघाताई बोबडे ,पद्माताई फुटाणे, दमयंती ताई उमेकर सौ संगीताचा व प्रेमाताई लवाळे, आशाताई धवणे, वंदना गायनर ,शारदा ढवळे,नंदाताई चाफले व सल्लागार, डॉ . मायाताई गंधे,वंदनाताई एडकर उपस्थित होत्या.
तसेच महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच चे पदाधिकारी अशोक जी लव्हाळे ,राजेंद्र मस्के, सदाशिवराव गाडेकर ,सचिन शहाकार ,ज्ञानेश्वरजी ढोमणे, डॉ.सुधाकरराव काळमेघ, काशिनाथराव फुटाणे, प्रदीप भाऊ कोल्हे पुरुषोत्तम जी कोल्हे ,नामदेवराव खैरकर चंद्रशेखर टेकाळे ,प्रकाश वाढे ,संतोष साव जानकीराम वसत्कर, इत्यादी मंडळी उपस्थित होती.
विविध संघटनाचे पदाधिकारी देवा संघटनेचे अध्यक्ष श्री सुभाषराव गोहत्रे, नानासाहेब लव्हाळे, रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी हर्षा मोहोळ, महाराष्ट्र धनगर अधिकारी कर्मचारी संघ शाखा अमरावतीचे अध्यक्ष श्री प्रवीण लांडे ,उपाध्यक्ष श्री प्रवीण भागवत , तसेच समाजसेवक घनश्याम भाऊ बोबडे अमित महात्मे ऍड.अचल कोल्हे , विजय गो हत्रे,, श्री घटारे, वामनराव सरोदे ,पातोंड सर इत्यादी यावेळी उपस्थित होते.

