सावंगा विठोबा नगरीत “अमावस्या” निमित्त “चंदन उटी” कार्यक्रम

सावंगा विठोबा नगरीत “अमावस्या” निमित्त “चंदन उटी” कार्यक्रम

MB NEWS(चांदुर रेल्वे) :- अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ६/६/२०२४ गुरूवारला दुपारी ४.३० वाजता संस्थानच्या वतीने अमावस्या निमित्त “चंदन – ऊटीचा कार्यक्रम” आणि रात्री ८.०० वाजता अवधूत नाम प्रचारक सुरेश ठाकरे महाराज, पुलगाव जि.वर्धा यांचा “प्रवचन कार्यक्रम” आयोजित करण्यात आलेला आहे.*
*बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा विठोबा ता.चांदुर रेल्वे जि.अमरावती या संस्थानला दानशूर व्यक्तींनी जमीन दान दिल्या आहेत,त्या जमीनी अजूनही संस्थानला ज्ञात नाही, ज्या भाविक भक्तांना अशा जमीनीबद्दल माहिती आहेत, त्यांनी या जमीनीची माहिती संस्थानला देवून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वैतागराव नेमाडे यांनी केले आहेत.*
*अगदी थोड्याच दिवसात विभागीय नियंत्रक अमरावती विभाग अमरावती यांचे संस्थानला प्राप्त पत्रांन्वये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन वेळापत्रकात सावंगा विठोबा येथे अमरावती व चांदुर रेल्वे येथून एस. टी. बसेस सुरू होत आहे,तरी सर्व भाविक भक्तांनी या प्रवास सुवीधाचा जास्तीत जास्त लाभ घेवून एस.टी.महामंडळाला सहकार्य करावे, अशी विनंती संस्थानचे वतीने करण्यात आली आहे.*
*तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वै. नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर रा. राऊत, सचिव अशोक ह. सोनवाल सर्व विश्वस्त विनायक तु. पाटील,वामण के.रामटेके,गोविंद रा. राठोड,दिगांबर ना. राठोड,अनिल दि. बेलसरे,फुलसिंग रु. राठोड,चरणदास ना. कांडलकर,वैभव दि. मानकर, स्वप्निल ब. चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे