पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक!!* डॉ.. राजीव ठाकूर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते!!

*पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक!!* डॉ.. राजीव ठाकूर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते!!

MB NEWS (प्रफुल्ल कुकडे)अमरावती :-(स्थानिक)दि :-१६-०६-२०२४:- जागतिक तापमान वाढ (Global Warming ), हवामान बदल (Climate Change )हे चिंतेचे विषय आहेत. त्यामुळे आपले जीवनमानावर परिणाम होत असून भविष्याचा विचार करता,अमरावती शहरातील विविध सामाजिक संघटना,संस्था, व्यक्ती च्या सक्रिय सहभागानी पर्यावरण संवर्धन अभियान सुरुवात करण्यात आलीआहे, *पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे अत्यंत* *आवश्यक आहे* असे प्रतिपादन डॉ.राजीव ठाकूर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी अभियान शुभारंभ प्रसंगी केले.आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ अंतर्गत पर्यावरण संवर्धन अभियान शुभारंभ दिनांक १६ जून २०२४ रविवार सकाळी ८. ०० वा. हनुमान मंदिर परिसर जिल्हा परिषद कॉलनी, राम नगर,प्रशांत नगर गार्डन जवळ अमरावती,येथे वृक्षारोपण करून सपन्न झाला. या *कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजीव ठाकूर, माजी नगरसेवक बंडूभाऊ हिवसे,प्रा. रवींद्र खांडेकर,प्रा. अरुणभाऊ मंगळे, अभय देव, बाबासाहेब चव्हाण,शिवकुमार अग्रवाल,भास्कर जावरकर, रजियाताई सुलताना, शशी काकांनी,यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले.* अभियान अंतर्गत बीज संकलन, वृक्षारोपण, संवर्धन, संगोपन, प्लास्टिक निर्मूलन, जनजागृती,असे कार्यक्रम बाबत सर्वांनी सविस्तर मांडणी करण्यात आली व पुढील नियोजन करण्यात आले..कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. भारत कल्याणकर संयोजक यांनी केले, बीज संकलन व अभियान बाबत मांडणी प्रा.शांताराम चव्हाण यांनी केली,कार्यक्रमाचे संचालन भाई प्रफुल्ल कुकडेयांनी केले, आभार हर्षा सगणे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रकाश मानेकर, विवेक वाडेकर,धर्मेंद्र भांडारकर,दिगंबर मेश्राम,,मुकुंद काळे,प्रा. संतोष शुक्ला, डॉ. विनोद रोडे, राजू देशमुख,दिलीप लाडे,विजय चौधरी, बापूराव तालन ,गोपी भैया,निलेश ढेंगळे,विजय डवरे,प्रवीण वासनिक, अरुण गुल्हाने,अजिंक्य भांडारकर, हर्षा सगणे, कुमुदिनी वाडेकर, शिरीन खान, विजया निस्ताणें, प्रणाली भांडारकर,तसेच आम्ही भारतीय – जनसांस्कृतिक चळवळ , गुड मॉर्निंग गृप -रेल्वे स्टेशन अमरावती , जिल्हा परिषद गृहनिर्माण सोसायटी जिल्हा परिषद कॉलनी अमरावती , प्रा. राजकुमार दासरवाढ समाजकार्य महाविद्यालय अमरावती, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह युनियन.(MSMRA), क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, राष्ट्रसेवादल, सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी सामाजिक विचार प्रबोधन अभियान, गणपती महाराज श्वेत निशानधारी अजातीय मानव प्रबोधन मंच. महाराष्ट्र सर्वोदय मंडळ आदी व्यक्ती संघटन यांनी अथक परिश्रम घेतले तसेच सर्वांच्या एकत्रित व सामूहिक प्रयत्नातून पर्यावरण संवर्धन अभियान राबविले जाणार आहे. या कार्यक्रम मध्ये आज १० वृक्षाचे रोपण करण्यात आले तसेच बीज व रोपटे वाटप करण्यात आले.कार्यक्रमांस परिसरातील नागरिक व महिला यांची उपस्थिती होती.शेवटी क्रांतीगीताने कार्यक्रम सपन्न झाला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे