धानोडी येथे विज पडून एका बैलाचा मृत्यू..
MB NEWS चांदूर रेल्वे :-अतुल उज्जैनक(र्विशेष प्रतिनिधी):- १६ /७/२०२४ झालेल्या पावसमध्ये जोरदार कडाडकेली विज चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोडी या गावातील रहिवासी सतीश दाभाडे (वय ४५) ह्या शेतकऱ्याच्या घरी असलेल्या गोठ्यात दुपारच्या सुमारास गोठ्यातील बैजोडीतील एका बैलाच्या अंगावर विज पडून बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे सतीश दाभाडे ह्या शेतकऱ्यवर दुःखाची कुऱ्हाडच जणू कोसळली आहे.
बैलजोडीतील एक बैल नसल्यामुळे आता शेतीतील कामे कशी करावी हा यक्ष प्रश्न दाभाडे यांच्यासमोर उभा ठाकला आहे .आधीच नापिकी, कधी कोरडा दृष्काळ अशातच अशा आपत्तीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ही गंभीर समस्या सुद्धा दाभाडे यांच्या समोर उभी आहे.सदर घटनेची माहिती दाभाडे यांनी ग्रामसेवक व तलाठी यांना दिली असून आता पुढे नुकसान भरपायी मिळते की काय यावर सर्व ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे..

