चांदूर रेल्वे शहरात उबाठा शिवसेनेच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ,हजारो कार्यकर्त्यांनी घेताला शिवसेनेत प्रवेश
MB NEWS:-(चांदूर रेल्वे):- शहरातील स्वं बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेना नेते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांच्या हस्ते गोर गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ढोलताशे व फटाक्यांच्या आतिशबाजीत करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताहा व गाव तेथे शिवसेना तसेच बाळासाहेबचे ब्रीद वाक्य ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण करून जनसामान्य जनता व शेतकरी शेत मंजूर महिला यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वं बाळासाहेब ठाकरे चौकात संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले यावेळी अभिजित ढेपे म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर शासन नवीन योजना सुरू करता असून गरीब महिलेना त्रास देत आहे कारण सदर योजने करीता राष्ट्रीय बँकेत ५०० रूपये लागते गरीब महिला हि रक्कम कुठून आणणार म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकने १०० रूपये घेऊन खाते उघडण्याचे निर्णय घेत हे पैसे ही आम्ही भरू असे यावेळी उपस्थित जनसमुदायास सांगितले उध्दव ठाकरे यांचे अडीच वर्षाचे कार्य बघत लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने विश्वास दर्शविला तसाच विश्वास येणार्या विधानसभेत जनता शिवसेनेवर दाखविणार आहे आम्ही कुठलीही जात धर्म पक्ष न पाळता गरीबांची सेवा करण्याची तयारी आहे म्हणून त्या दिशेने पक्षाची वाटचाल सध्या सुरू आहे यावेळी मंचावर शिवसेना नेते जिल्हा मध्यवर्ती बँकचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे,शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू, उपजिल्हा प्रमुख राजेश पांडे, तालुका अध्यक्ष संजय चौधरी, युवा सेना जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरे,शहर प्रमुख गजानन यादव,धामणगाव माजी तालुका प्रमुख निलेश तिवारी,नादगाव खडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभात ढेपे, धामणगाव विधानसभा संघटक बाळासाहेब राणे, तालुका प्रमुख प्रमोद कोहळे यांनी आपले विचार मांडत शिंदे व भाजपा सरकारवर जोरदार टीका केली यावेळी आशिष गांवडे, प्रमोद खवड,स्वप्नील मानकर शुभम तायवाडे,श्याम खोडे कौस्तुभ खेरडे,गजानन बोबडे, हेमंत हटवार,संदीप माहुरे,धनंजय मेंटकर,प्रकाश जयसिंपुरे,आसिफ पठाण,सचिन तांडेकर, शरद गोळे, शुभम ठाकरे, पंकज भरडे व इतर शिवसैनिक तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी शिवसेना तालुका प्रमुख राजेश निबर्ते यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

