माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमचे आयोजन,85 किलो लाडूची तुला,तर 104 रक्तदात्यांनी केले रक्तदान,

माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमचे आयोजन,85 किलो लाडूची तुला,तर 104 रक्तदात्यांनी केले रक्तदान,

 MB NEWS :-विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,
त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी 11 ऑगस्ट ला सकाळी शहरातील मिलिंद नगर येथील महामानवाच्या फोटोचे हारार्पण करून पूजन करण्यात आले.. नंतर रेल्वे स्टेशन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आजाद यांच्या पुतळ्याचे व नगर परीक्षेत रंगनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले., तर बाळासाहेब ठाकरे चौकात माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची 85 किलो मोतीचूरच्या लाडूने तुला करण्यात आली, नंतर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यशवंत मंगल कार्यालय मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी धामणगाव मतदार संघातील हजारो कार्यकर्ते यांनी माजी आमदार यांचे हारफुले भेट वस्तू व गुलदस्त देवून स्वागत करण्यात आले,यावेळी सध्या वर्षवास महिन्यात ग्रंथ वाचन करणाऱ्या वाचकांचा शाल श्रीफल,व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 104 रक्तदात्यांनी रक्तदान केले, पांडुरंगाची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सुद्धा माजी आमदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, जे मुस्लिम बांधव हजला जाऊन आले अशा मुस्लिम बांधवांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला,
यावेळी मंचकावर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे , जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी अध्यक्ष उत्तराताई जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल होले, माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ,वर्धा येथील नितेश कराळे यांची उपस्तिती होती.
कराळे सर यांनी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उबाठा शिवसेना गटाचे प्रकाश मारोटकर बाळासाहेब भागवत, श्री राणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अशोकराव देशमुख, विनोद काळमेघ, अमोल दुधाट उपस्थित होते.
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर,चांदुर रेल्वे,या भागातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माझी जि प अध्यक्ष नितीन गोंडाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरिभाऊ गवई,तालुका काँग्रेस कमिटीचे अमोल होले, शहर काँग्रेस कमिटीचे निवास सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी,परीक्षित जगताप,अशोकराव चौधरी,राजेंद्र राजणेकर,विवेक राऊत,एडवोकेट शिवाजी वाघ, ड्रा सागर वाघ, सचिन मोदी, सतीश जयस्वाल, रुपेश पोलाद,सुमेध सरदार, शहजाद सौदागर, अनिस सौदागर, महेश कलावटे, प्रफुल कोकाटे,वैभव मलवार, अभिजित देशमुख,भीमा पवार,पंकज मेश्राम, सारंग देशमुख,संजय कोल्हे, अजय होटे, रुपेश पुडके राजू लांजेवार, अजिंक्य आरेकर गजानन चोरे, सागर गरुड, विलास मोठघरे, बंटी माकोडे, सतीश देशमुख राहुल कोरडे,दिनेश मारोटे,बबन वानखडे, शेख रशीद, अंनत पोलाद,राहुल कोरडे, सतीश देशमुख,सागर भोंडे, अतुल विद्या मंदिर द्वारा संचालित राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद व अतुल जगताप माध्यमिक शाळेचे शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर यावेळी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते यावेळी हजर होते,

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे