शहर काँग्रेस पूर्ण क्षमतेने निवडणुकीला सज्जकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री.कुणालजी चौधरी यांचे उपस्थितीत शहर काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

शहर काँग्रेस पूर्ण क्षमतेने निवडणुकीला सज्जकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री.कुणालजी चौधरी यांचे उपस्थितीत शहर काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

MB NEWS (अमरावती) :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राचे प्रभारी श्री. कुणालजी चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेस भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाली.या बैठकीत सहभागी झालो. या वेळी मंचावर खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर , शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चीमोटे,अशोकराव डोंगरे,किशोर बोरकर,भैया पवार, बाळासाहेब भुयार, जयश्रीताई वानखडे, हाजी नजीर खान, नसीम खान, निलेश गुहे,वैभव देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे