क्रांती गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम , जन्मानसांसाठी केले आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन….

क्रांती गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम , जन्मानसांसाठी केले आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन….

MB NEWS चांदूर रेल्वे,प्रतिनिधी (अतुल उज्जैनकर) सद्या गणेशोत्सावाचे पर्व सुरु आहे ,अशातच क्रांती गणेश मंडळ ,क्रांती चौक ह्या मंडळाने समाजिक जाणीवेतून जन्मानसांसाठी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले .ह्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मधुमेह व ह्रदय विकार अशा आजरा विषयी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन व औषध उपचार करण्यात आले तसेच बी.पी .शुगर सारख्या तपासण्या सुद्धा मोफत करण्यात आल्या. ह्या आरोग्य तपासणी शिबिराला गेट लाईफ डाबेटिक्स क्लिनिक, अमरावती येथून डॉ.स्वप्नील दुधाट व् त्यांची चमू यांनी सेवा दिली. या प्रसंगी परिसरातील अनेक जेष्ठ नगरिक ,महिला तसेच युवक ,युवत्यानी ह्या शिबिराचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी व सदस्यांनी ह्या आरोग्य तपासणी शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले ह्याचीच फलश्रुती म्हणजे मंडळाच्या ह्या अभिनव उपक्रमाबाबत समाजातील सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे