आज गुरुकुंजात किर्तनकारांची मांदियाळी
दोन दिवस राज्यातील विविध किर्तनकारांचा गजर
MB NEWS(गुरुकुंज मोझरी) :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त्य श्रीगुरुदेव वारकरी कीर्तन संमेलन आयोजित करण्यात आले असून यामध्ये राज्यातील विविध किर्तनकार सहभागी होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मणदास काळे राहणार असून उद्घाटक रामायणाचार्य संजय पाचपोर तसेच प्रमुख अतिथी म्हणून पदमाकर देशमुख, प्रा.निलेश पर्बत, मधुकर भोसले. प्रमुख मार्गदर्शक संदीप गिऱ्ह, डॉ. प्रशांत ठाकरे, कैलास चव्हाण व प्रमुख उपस्थिती रामचंद्र कांडलकर, उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, प्रमोद जाणे तसेच समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक सुरेंद्र भूयार, प्रमुख अतिथी चंदेलेनाना (जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी देवाची), पुरुषोत्तम मोरे (तुकाराम महाराज संस्थान देहू), प्रमुख मार्गदर्शन सचिनदादा पवार (संपादक वारकरी दर्पण पुणे), प्रमुख उपस्थिती सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे, समन्वयक रमेश ढवळे, लक्ष्मण लटपटे. या कीर्तन संमेलनात नागेश आगलावे (बुलढाणा) ऋशिकेश मानमोडे (अमरावती), कैलास वाघाये (गोंदिया), बाळू डाके (यवतमाळ), सुश्री तेजस्वनी पाठक (मलकापूर), सुश्री अनुपमा पिंपळकर (यवतमाळ), सुरेश अढाव (संभाजी नगर), ज्ञानेश्वर मुंडे (लातूर), मारोती कोंढाळ (परभणी), आकाश वानखडे (वर्धा), गणेश सोनोने (बिड), ऋषिकेश पाटील (धुळे), सुश्री गौरी विटोले (नागपूर), गजानन जुनगडे (जालना), मंगेश वऱ्हाडे (बुलढाणा), दत्तात्रय माशेरे (खेड पूणे), दिपक भोयरी (रायगड), पांडूरंग चांदर (आळंदी), सुश्री समिक्षा चव्हाण (नाशिक), वैभव मेंगळे (पुणे) इत्यादी किर्तनकार या कीर्तनकार संमेलनात सहभागी होणार आहे.
आजचे कार्यक्रम
शुक्रवार, 18/10/2024
सकाळी ५.३० ते ६.३० : सामुदायिक ध्यान व चिंतन : संदीप गिहे
सकाळी ७ ते ८ : योगासन व प्राणायाम
सकाळी ८ ते ९: ग्रामगीता प्रवचन विजय ठाकरे
सकाळी ९.०० ते १०.०० : अभंग वाणी कु. श्रावणी भडके
सकाळी १० ते ५ : श्रीगुरुदेव वारकरी कीर्तन संमेलन गुरुकुंज वारी
सायंकाळी ६ ते ७ : सामुदायिक प्रार्थना व चिंतन – प्रा. सुभाष लोहे
रात्री ७ ते ८ : अभंगणवाणी श्रीकांत काठोळे
रात्री ८ ते १० : श्रीगुरुदेव वारकरी कीर्तन संमेलन गुरुकुंज वारी

