नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 60 गावात झंझावती प्रचार दौरा..डॉ. निलेश विश्वकर्मा यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
MB NEWS नांदगाव खंडेश्वर (ता.प्र.) दि.7: वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जवळपास 60 गावात जनसंपर्क दौरा केला. या दौर्यामध्ये मतदारांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. दौर्या दरम्यान मतदारांनी त्यांच्यासमोर ठेवलेल्या व्यथा त्यांनी ऐकून घेऊन त्यावर निवडून आल्यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगासपूर, धानोरा, ढवसरी, धारपड, नांदुरा, धानोरा फरसी, जयसिंगा, सेलू, वाटकूर, जनुना जावरा, चांगपूरा, जसापूर, जामखेड व चोरमाहुली या गावात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी घेतल्या. डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी निवडून आल्यावर 40 एकरात मतदार संघात राष्ट्रीय विद्यापीठाची निर्मिती करणार, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या तालुक्यात 100 खाटांचे रुग्णालय उभारणार, तसेच शेतकर्यांसाठी उत्तम बाराजपेठ जागतिक स्तरावरील व्यापारांचा समावेश, गरजु महिलांच्या हाताला काम, युवकांना रोजगार असे मुद्दे मतदारांसमोर मांडले. जिल्हा परिषदनुसार उद्योगाची उभारणी, 28 एकरात इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी स्वतंत्र क्रीडा विद्यापीठाची निर्मिती, महिलांच्या सुरक्षा, युवकांना रोजगार असे कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मतदार संघात घरकुलाचा प्रश्न अत्यंत कठीण झाला आहे. अनेकांना अद्यापही घरकुल मिळाले नाही. मी निवडून आल्यावर एका वर्षात एकाचेही घरकूल शिल्लक ठेवणार नाही असा विश्वास मतदारांना डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी यावेळी दिला. तसेच लग्नसमारंभासाठी गरिबांना सार्वजनिक मंगलकार्यालयाची स्थापना व पर्यटन क्षेत्र विकसित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रचार रॅली दरम्यान नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अवधुत आखरे, अजय पाटील, सतिश गोफनारायण, डिगांबर तिडके, रोहन मोहोड,धर्मेंद्र मोहोड, प्रदीप वाघमारे, धिरज इंगोले, अमोल पाटील, विकास बागडे, रवी डोंगरे, आकाश ठोंबरे, निर्मला मोहोड, सविता दुपारे, सविता रंगारी, वर्षा गायकवाड, सुजाता मोहोड, माया वाडेकर यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

