मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित…!
MB NEWS (दिल्ली) -: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित झाले आहे. फडणवीसांनी सोमवारी रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.
फडणवीसांकडे पहिली अडीच वर्षे त्यानंतर एकनाथ शिंदे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवतील. तसेच 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कायम राहणार आहेत. प्रत्येक पक्षाला 6-7 आमदारांसाठी एक मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे.

