विद्याविहार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

विद्याविहार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

MB NEWS प्रतिनिधी, तिवसा (सुनिल घोरमाडे):-
शालेय पोषण आहार अंतर्गत केंद्र शासनाच्या कार्यक्रमांतर्गत परसबाग तयार करणे व त्याचा उपयोग शालेय पोषण आहारात पोषण मूल्याची वाढ करण्याकरता देण्यात यावा या प्रमुख उद्देशाने वरा केंद्रांतर्गत येणाऱ्या विद्याविहार विद्यालय शेंदुर्जना बाजार येथे विद्यालयातील प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर अशी परसबाग फुलवलेली आहे सदर परसबागेमध्ये पालक, मेथी ,सांबार, शेवगा ,दोडके, मिरची, पदीना भुईनिंब,चमकुरा, चाकवत गोडनिंब,भाज्यांची झाडे त्याचबरोबर विविध रंगी फुले तसेच जांभूळ, आंबा, संत्री, सिताफळ, भोकर ,पेरू, आधी तसेच विविध औषधी गुणधर्म युक्त आवळा पिंपळ उंबर आधी झाडांची सुद्धा लागवण केलेली आहे निसर्गाचा समतोल टिकावा आणि निसर्गातील वस्तूंचा विद्यार्थ्यांना पुरेपूर लाभ व्हावा या उद्देशाने विद्याविहार विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल भारती यांच्या सहकार्याने शाळेतील शिक्षक श्री शरद पवार सर तसेच कुमारी ममता जाधव मॅडम प्रीती मोहोड मॅडम, भुसारी मॅडम कौशल गोंडचर सर गजानन शितळे श्रावण भाऊ बनकर आदींचे सहकार्य लाभले आहे त्याचबरोबर शाळेतील परसबागेकरीता लोक सहभाग सुद्धा मिळत असून शेतकरी उमेश घुर् डे आणि गावातील लोकांचे सहकार्य मिळत आहे विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करुन विद्याथ्यांना देण्यात यावा. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर व्हावे, असे विविध चांगले हेतु या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.
विद्यालयातील परसबागेचे कौतुक संस्थेचे सचिव भैया साहेब ठाकूर तसेच एस एम ढोके सर यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी निर्माण केलेली परसबाग परिसरात कौतुकाचा विषय ठरलेले आहे. सदर बाबीमुळे विद्यार्थ्यांमध्ये बाजाराशी संबंधित आणि पोषण मूल्याशी संबंधित माहिती शिक्षकांकडून मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे पोषण चांगल्या प्रकारे घडून येत आहे शाळेतील परसबाग ही अतिशय सुंदर दिसत असून ती परत भाग सर्वांना आकृष्ट केल्याशिवाय राहत नाही असे दिसत आहे शालेय परिसरात अशाच प्रकारे परसबाग जर निर्माण केल्या गेल्या तर विद्यार्थ्यांचा पोषण मूल्यात कमतरता पडणार नाही आणि विद्यार्थ्यांना पोषण तत्त्व मिळेल असे मत शाळेचे मुख्याध्यापक अनिल भारती सर यांनी व्यक्त केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे