शहरातील अंगणवाडी मध्ये लहान मुलांना खेळण्यांचे वाटप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुप्ता यांचा अनोखा उपक्रम
MB NEWS(चांदूर रेल्वे)प्रतिनिधी :- अतुल प्र. उज्जैनकर
शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुप्ता यांच्या वतीने मुलांच्या बौद्धिक विकासासोबत खेळाची आवड वाढावी यासाठी चांदूर रेल्वे नगरपालिका अंतर्गत मिलिंद नगर, महादेव घाट, खरकपूरा येथे असलेल्या चार अंगणवाडी मध्ये खेळण्यांचे साहित्य वाटप करण्यात आले.
अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांची बौद्धिक क्षमता वाढावी या उद्देशाने शहरातील प्रसिद्ध व्यापारी चंद्रकांत गुप्ता परिवाराने एक अनोखा उपक्रम राबवला, त्यात गुप्ता परिवाराने अभ्यासासोबतच खडकपूरा,मिलिंद नगर येथील आगणवाड्यांमध्ये खेळाची सोय केली. , शहरातील महादेव घाट येथे खेळण्यांचे वाटप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुप्ता, डॉ.कार्तिक गुप्ता, अभियंता प्रतीक गुप्ता, पत्रकार अमोल गवळी, बंडू आठवले राजेश सराफी, प्रवीण शर्मा, माजी नगरसेवक बच्चू वानरे , शक्ती नेवारे, गजानन ठाकरे, अंगणवाडी सेविका अरुणा आठवले, शारदा राऊत, सिमा बोडखे, सुनंदा कांडलकर,नंदा नेवारे यांच्यासह मोठ्या संख्येने आगणवाडी मुले उपस्थित होती.

