सावंगा विठोबा नगरीत “अमावस्या” निमित्त “चंदन उटी” कार्यक्रम आणि “चैत्र मास मांड शुभारंभ

सावंगा विठोबा नगरीत “अमावस्या” निमित्त “चंदन उटी” कार्यक्रम आणि “चैत्र मास मांड शुभारंभ

MB NEWS(चांदुर रेल्वे) :-अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २७/२/२०२५ गुरुवारला सकाळी ५.०० वाजता संस्थानचे लहान मंदिरात विधीवत ढाल बसवून मुख्य मंदिरात चैत्र मांडीचा शुभारंभ महाराजांचे गणाने विश्वस्त मंडळ आणि भाविक भक्तांचे उपस्थित होत आहे आणि दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने अमावस्या निमित्त “चंदन – ऊटीचा कार्यक्रम” आयोजित करण्यात आलेला आहे.*
*चंदनउटी नंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता “महाप्रसाद कार्यक्रम” अन्नदान दाते रुख्मिणी कृष्णराव चांगोले,अमरावती यांचे तर्फे आणि संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजित करण्यात आला आहे.*
*संस्थानमध्ये दि.२७/२/२०२५ ते दि.८/४/२०२५ पर्यंत संस्थान तर्फे “चैत्र मास” निमित्त “अखंड जागृती भजन” मांडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाहेर गावातील अवधूत भजन मंडळांचा सहभाग राहणार असून या करिता संस्थानचे वतीने नियोजन करण्यात आले आहे.संस्थान तर्फे सहभागी अवधूत भजन मंडळाचा सन्मान करण्यात येऊन दैनंदिन चहा,नास्ता आणि भोजन इ.व्यवस्था करण्यात आली आहे.*
*दि.१८/२/२०२५ रोजी संस्थानमध्ये संस्थानचे विश्वस्त मंडळाचे सामान्य सभेत गुढीपाडवा यात्रा महोत्सव नियोजनबद्ध साजरा करण्याचे दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात यावी, असे ठरविण्यात आले आहे.*
*तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील,वामण रामटेके,गोविंद राठोड,अनिल बेलसरे,फुलसिंग राठोड,चरणदास कांडलकर,लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे