श्रीकृष्ण मंदिरात ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण सोहळ्याचे आयोजन..

श्रीकृष्ण मंदिरात ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण सोहळ्याचे आयोजन..

MB NEWS (अमरावती):- माताखिडकी परिसरातील पुराण प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्टचे वतीने ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण सोहळ्याचे आयोजन १७ मार्च ते २३ मार्च २०२५ पर्यंत श्री चक्रधर स्वामींनी आपल्या श्रीमुखाद्वारे निरोपिलेल्या ब्रह्मविद्या शास्त्रावर निरूपण होणार आहे.

. या सोहळ्याअंतर्गत दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ब्रह्मविद्या पाठशाळा महानुभाव आश्रम दरी, नाशिक चे संचालक प.पु.प.म. श्री. भाईदेवमुनी महानुभाव यांचे निरूपण होणार आहे
१७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता प्रवचन मालेचे उद्घाटन होईल त्याचप्रमाणे १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सांगता समारोह होईल

तरी सर्व भाविक भक्तांनी या धर्मरूप ज्ञान श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पावडे उपाध्यक्ष डॉ. अशोक राऊत सचिव ॲड. अरुण ठाकरे कोषाध्यक्ष इंजि. एस.पी. देशमुख विश्वस्त सुशांत चर्जन, अनिल सहानी, रावसाहेब राऊत यांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे