तळेगाव ठाकूर जिल्हा परिषद कन्या शाळेतील आरुषी निमावत नवोदय परीक्षेत घवघवीत यश
MB NEWS (सुनिल घोरमाडे) :- तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील कु.आरुषी अनिल निमावत हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिली होती.तळेगाव ठाकूर येथील कु.आरुषी अनिल निमावत ही जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेची इयत्ता पाचवी मध्ये शिकत होती.कु.आरुषी ही सामान्य घरातील मुलगी आहे.कु. आरुषी हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024-25 ह्या वर्षी दिली असता नुकताच निकाल लागला असता तिने घवघवीत यश संपादन केले.कु.आरुषी ने दाखवून दिले की जिल्हा परिषद शाळेत असूनही घवघवीत यश संपादन करू शकतात.कु.आरुषी हिने नवोदय विद्यालय प्रवेश प्रकियेत घवघवीत यश मिळवून गावाच्या सन्मानात यशाचा तुरा रोवला यासाठी आरुषीचे तळेगाव नगरीतील पालक,शाळा व्यवस्थापन समिती व संपूर्ण शिक्षकवर्गातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.ती आपल्या यशाचे श्रेय मुख्याधिपीका सौ.कावळे मॅडम, वर्गशिक्षिका सौ.सुचिता ढाले मॅडम तसेच निलेश कांडलकर सर,नवनीत निशाण सर,गणेश वाढवे सर, संगीता गाडगे मॅडम, ज्ञानेश्वर माळोदे व सरिता टाकरखेडे मॅडम यांना देतात.

