पंचायत समिती चांदुर रेल्वे येथे रक्तदान शिबीर संपन्न.
MB NEWS (चांदुर रेल्वे ):-दिनांक 23/06/2025 रोजी पंचायत समिती चांदुर रेल्वे येथे मा. संचिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांच्या कल्पनेतून भव्य रक्तदान शिबिर पंचायत समिती चांदुर रेल्वे येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला अमरावती येथून डॉ. आशिष वाघमारे रक्त संक्रमण अधिकारी, मिलिंद तायडे जनसंपर्क अधिकारी, सौ संगीता गायधने, जयंत गावंडे, प्रवीण कळसकर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील टीम होती. कार्यक्रमाला माननीय संजयजी खारकर गटविकास अधिकारी, श्री रमेश मेश्राम विस्तार अधिकारी पंचायत समिती, श्री सुरेश चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत समिती, राजेंद्र पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी, श्री यादव साहेब सहाय्यक प्रशासन अधिकारी, राहुल गवई तसेच डॉ. नम्रता सोनोणे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे, डॉ. प्रियंका निकोसे तालुका आरोग्य अधिकारी चांदुर रेल्वे, श्रीमती विमल मारबदे विस्तार अधिकारी, श्रीमती सुरेखा पवार विस्तार अधिकारी, प्रफुल्ल जुमडे आरोग्य सेवक पंचायत समिती, मनीष पिंजरकर तालुका सिकलसेल कार्यक्रम सहाय्यक, गौतम मनोहर, मीनाक्षी चौधरी, वैशाली भुवते प्रयोगशाळा तंत्रज्ञ हजर होत्या. सिकलसेल पंधरवडा साजरा करण्यात आला तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा उत्कर्ष प्रतिसाद होता.

