नागपुरातील शिक्षक घोटाळा प्रकरणात एका संस्था चालकाला अटक
MB NEWS (नागपूर) – नागपूरच्या शिक्षक घोटाळा प्रकरणात नागपुरातील एका संस्था चालकाला अटक करण्यात आली आहे.
एस के बी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यामंदिर नागपूर ह्यांच्या नामक तीन संस्था आहे. यामध्ये 30 शिक्षकाचा बोगस शालार्थ ID असल्याचा आरोप केला आहे.ओमकार अंजीकरचा अटकेनंतर त्याचा PCR मिळवला आहे. 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत तपास केला जाणार आहे. या संबंधित आरोपीचा तपास सुरू आहे. त्यावेळी कोण शिक्षणाधिकारी होते, या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच पुढच्या काळामध्ये आरोपीची संख्या वाढणार आहे.
बोगस शालार्थ ID बनवलेल्या 36 शैक्षणिक संस्थेत 600 च्यावर शिक्षकांची संख्या आहे. त्यामुळे पुढच्या काळात आरोपींची संख्या संख्या टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.निलेश वाघमारे हा फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. त्या त्या ठिकाणी पथक पाठवत आहे.

