चांदुर रेल्वे येथे तैलिक समाजाची मीटिंग सपन्न युवा युवा उद्योजक कैलास गिरोळकर यांची उपस्थिती.

चांदुर रेल्वे येथे तैलिक समाजाची मीटिंग सपन्न
युवा युवा उद्योजक कैलास गिरोळकर यांची उपस्थिती.

MB NEWS (चांदुर रेल्वे) :-चांदुर  रेल्वे तालुका व शहरातील स्पार्क कम्प्युटर या ठिकाणी युवा उद्योजक यांच्या अध्यक्षतेखाली तैलीक संघाची मीटिंग घेण्यात आली.यावेळी तालुक्यातील व शहरातील तैलिक समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

यश असोसिएट्स व आसरा हॉटेल, सावली बचत गट यांच्या तर्फे 19 जुलै रोजी राज्यस्तरीय तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार उद्योजक मेळाव्याचे आयोजन सांस्कृतिक भवन अमरावती करण्यात येणार आहे.
यश असोसिएट्स, आसरा हॉटेल व सावली बचत गट तर्फे येत्या 19 जुलै ला राज्यस्तरीय तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार व उद्योजक मेळावा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली या बैठकीला समस्त तेली समाज बांधव व समाजातील पदाधिकाऱ्यांची हजेरी होती. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व पुढील करिअर कशी करायची याबाबत मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी काही स्पीकर्स येणार आहात या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती कैलास छाया चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे करण्यात आली आहे. या बैठकीसाठी कैलास गिरोळकर, जयंतराव औतकर, नितीन भाऊ जावरे,आशुतोष गुल्हाने, दिलीप भाऊ गुल्हाने, केशव भाऊ वंजारी, निलेश गुल्हाने, रमेशराव गुल्हाने, अशोकराव हांडे, महेश गुल्हाने, बंडूभाऊ आंबटकर, राजेश डिवरे ,अतुल शिरभाते, रमेश भाऊ गिरोळकर ,नरेंद्र ढोबळे, योगेश डोनेकर, सचिन बिजवे,दीपक गिरोळकर,मनीष खुणे, धनश्रीताई श्रीराव ,छायाताई गिरोळकर, योगिताताई कळंबे, लीनाताई जावरे, स्वातीताई निस्ताने ( तिखिले )धनश्री जीरापुरे इत्यादी समाजबांधव हजर होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे