8 वर्षीय शाळकरी चिमुकल्याचा संशयस्पद मृत्यू; गळा आवळून मारल्याचा प्राथमिक अंदाज
MB NEWS (जालना) -:जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील गणपती इंग्लिश स्कूल येथे आदिवासी वस्तीग्रह मध्ये जालना जिल्ह्यातील परतुर येथील आदिवासींचे बहीण भाऊ शिकायला होते. बहीण चौथीला होती, तर भाऊ हा वर्ग दुसरी मध्ये होता. सदर चिमुकल्याचे नाव बालवीर अजय पवार वय 8 वर्ष वर्ग दुसरा. दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास तो मृत अवस्थेत आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालय दाखल केला. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सदर चिमुकल्याच्या गळ्याला आवळल्याच्या खुणा डॉक्टरांना व पोलिसांना आढळून आले असून, सदर चिमुकल्याचा मृत्यू हा गळा आवळून केला असल्याच पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. यामध्ये सदर मयत मुलाचे दोन अल्पवयीन मित्र पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. व यात पोलिसांनी कोणाचा गुन्हा दाखल केला, असल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

