Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तरुणीच्या अल्पवयीन भावाने बहिणीच्या मित्रावर केला चाकूने वार

तरुणीच्या अल्पवयीन भावाने बहिणीच्या मित्रावर केला चाकूने वार

MB NEWS प्रतिनिधी (नांदेड) –नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 जुलै रोजी अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन महाविद्यालयीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत तामसा रोडवरील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या होत्या.

त्यापैकी एका तरुणीचा भाऊ आपल्या बहिणीला लॉजवर असल्याची माहिती मिळताच, तो आपल्या दोन मित्रांसह तिथे पोहचला. बहिणीला सत्ताजी भरकड या तरुणासोबत खोलीत पाहून भावाचा संताप अनावर झाला. आणि त्याने त्याठिकाणीच वाद घातला.
घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिचा हात फ्रॅक्चर झाला. दरम्यान, भावाने आणि त्याच्या मित्रांनी सत्ताजी भरकड याला लॉजमधून बाहेर ओढून नेले, आणि भोकर फाट्यानजीक त्याच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले.
सत्ताजी भरकडवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर, पीडित तरुणीने तक्रार देत सांगितले की सत्ताजी भरकड, नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांनी तिला बळजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या तक्रारीवरून तिघांविरुद्ध बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, सत्ताजी भरकडच्या तक्रारीवरून अल्पवयीन भावासह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे