भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राजर्षी शाहू सायन्स कॉलेज येथे वृक्षारोपण कार्यक्रम
MB NEWS प्रतिनिधी (चांदुर रेल्वे)– स्थानिक राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे मधील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग वडनेरकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जी बी संतापे व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रोशनी भगत व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी केले.सदर कार्यक्रमांमध्ये सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

