कृषि विज्ञान केंद्र, घातखेड अमरावती 1 यांच्या वतीने_ विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत शेती दिन कार्यक्रम संपन्न_*सोनोरा येथील अनेक शेतकऱ्यांनी घेतला या शेती प्रशिक्षणाचा लाभ

कृषि विज्ञान केंद्र, घातखेड अमरावती 1 यांच्या वतीने_
विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत शेती दिन कार्यक्रम संपन्न_*सोनोरा येथील अनेक शेतकऱ्यांनी घेतला या शेती प्रशिक्षणाचा लाभ

MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र) :- दि. 2 डिसेंबर २०२५ रोजी भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर यांच्या मार्फत कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या मार्गदर्शनाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, घातखेड अमरावती अंतर्गत मौजे सोनोरा भिलटेक ता. चांदूर रेल्वे येथील शेतकरी श्री राजेश ठोंबरे यांच्या शेतावर सघन लागवड पद्धत कापूस लागवड तंत्रज्ञान या बाबत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या शेती दिन कार्यक्रमाला अध्यक्ष कृषि विज्ञान केंद्र, घातखेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.अतुल कळसकर, प्रमुख मार्गदर्शक विशेष कापूस प्रकल्प जिल्हा नोडल अधिकारी व विषय विशेषज्ञ कृषीविद्या श्री.प्रमोद मेंढे, सोनोरा येथील सरपंच श्री सुरेश मेश्राम, पोलीस पाटील श्री घनश्याम काळे व गावचे प्रगतशील शेतकरी जितेंद्र ठोंबरे ,निलेश रवाळे ,निलेश जुनघरे, पियुष ठोंबरे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शनामध्ये श्री प्रमोद मेंढे यांनी कापूस पिकाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तसेच त्यांनी बोंड अळी व्यवस्थापनाबद्दल, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पियुष ठोंबरे, निलेश जुनघरे, जितेंद्र ठोंबरे, निलेश रवाळे या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्ष भाषणामध्ये डॉ.अतुल कळसकर यांनी शेतकऱ्यांना विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत कपाशी चे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशेष कापूस प्रकल्प सहाय्यक YP -II श्री . शुभम लहाने आभार प्रदर्शन विशेष कापुस प्रकल्प सहाय्यक श्री दिगंबर सातंगे YP – I यांनी केले. कार्यक्रमासाठी सोनोरा येथील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणिता भोंगे, दिगंबर सातंगे,शुभम लहाने, गजानन ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे