साईनाथ कॉलनीत भव्य सामूहिक हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)-चांदूर रेल्वे येथील साईनाथ कॉलनीतील महिला मंडळांच्या वतीने पारंपरिक संस्कृतीचे जतन व महिलांचे एकत्रीकरण या उद्देशाने भव्य सामूहिक हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी एकत्र येत या कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व नियोजनबद्ध आयोजन केले.
या कार्यक्रमास शहराच्या नवनियुक्त नगराध्यक्षा मा. प्रा. प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शहरातील सर्व मान्यवर नगरसेविका, तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या परंपरा, संस्कृती व सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात अंदाजे पाचशेहून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हळदी-कुंकू, वाण, सांस्कृतिक संवाद व आपुलकीच्या वातावरणात महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी साईनाथ कॉलनीतील महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.
या उपक्रमात विशेष योगदान देणाऱ्या महिला मंडळाच्या सदस्यांमध्ये
सौ. रजनी राऊत, सौ. छाया वाघ, सौ. साधना सराड, सौ. सविता जयसिंगपुरे, सौ. संगीता सहारे, सौ. पुष्पा ठाकरे, सौ. सुषमा स्तुल, सौ. सविता देशमुख, सौ. मीनाक्षी खेडकर, सौ. कल्पना इंगोले, सौ. अश्विनी सुरसुड, सौ. निशिगंधा कोकाटे, सौ. अर्चना पातुर्डे, सौ. वर्षा बडवाईक, सौ. पुनम चव्हाण, सौ. श्रद्धा राऊत, सौ. प्रतिभा खेरकर, सौ. प्रीती देशमुख, सौ. शुभांगी लाडे, सौ. रूपाली ठवकर, सौ. डॉ. श्रुती वाघ, सौ. प्रतिभा सराड, सौ. नुपूर संत, सौ. प्रतीक्षा मोरे, सौ. कविता देशमुख व सौ. कंचन कर्से यांचा उल्लेखनीय सहभाग लाभला.
साईनाथ कॉलनीतील महिला मंडळांचा हा उपक्रम महिलांच्या संघटनशक्तीचा, संस्कृतीप्रेमाचा व सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श ठरत असून परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

