छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान

MB NEWS (चांदूररेल्वे) – चांदूर रेल्वे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर शिव,फुले आंबेडकर उत्सव समित्यांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने १९ फेब्रुवारी ला सकाळी शहरातून भव्यदिव्य बाइक रैली काढण्यात आली तर २१ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता शिवारंभ आख्यानाचा ग्रुप अमरावती यांच्या आख्याताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर शिवाख्यान कर्ते प्रा प्रवीण देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान करत आजचे राज्यकर्ते व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्यकारभारातील फरक उपस्थित शिव प्रेमी समोर प्रखरतेने मांडला.

चांदूररेल्वे शिव फुले आंबेडकर जयंती उत्सव समित्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांची सुरूवात शिवरंभ ग्रुप तर्फे शिव आख्याताने करण्यात आली तर प्रा प्रवीण देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान करत सांगितले की पराकोटीच्या पराक्रमाला पराकोटीची संवेदनशीलता असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, सर्वधर्म सहिष्णुता या मूल्यांना जोपासणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शेतकरी, स्त्रिया, आबाल, वृद्ध या सर्वांना अभय दिलं आणि लोक कल्याणकारी राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं म्हणूनच उदात्त मानवी मूल्य जोपासणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा.प्रवीण देशमुख यांनी चांदूररेल्वे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात उपस्थित शिवप्रेमी समोर केले त्यांनी शिवकालीन विविध प्रसंग सांगत महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला तर अनेक लेखकांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ओळींची आठवण करून दिली तर युव काँग्रेस नेते परिक्षिती जगताप यांनी ही आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विरेंद्र जगताप,  प्रमुख व्याख्याते प्रा. प्रविण देशमुख तसेच प्रमुख अतिथी म्हणून चांदूररेल्वे नगराध्यक्षा प्रियंका विश्वकर्मा, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत अध्यक्ष प्राप्ती मारोटकर,नगरसेवक प्रकाश मारोटकर,निशिकांत जाधव,दिपक सवई,सभापती जगदीश आरेकर, गोविंद देशमुख,नितिन दगडकर, प्रभाकर वाघ,माजी जिप अध्यक्ष नितीन गोडाणे,ज्योती आरेकर,सुरेश निमकर,प्रविण घुईखेडकर, सुधिर पाटेकर,बबन मांडवगडे,  उत्तरा जगताप,श्रीकांत गावंडे,कविता गावंडे,पंकज वानखेडे,वर्षा देशमुख,नगरसेविका कल्पना लांजेवार, एडवोकेट कीर्ती इमले,पूनम कोकाटे गट नेते अनिस सौदागर माजी नप अध्यक्ष शिटटू सुर्यवंशी, अंजली अग्रवाल,तालुका अध्यक्ष अमोल होले,या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मंचावर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिव,फुले,आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ सागर वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन अभिजित देशमुख तसेच आभार श्रीनिवास सुर्यवंशी यांनी मानले या कार्यक्रमाला शिव,फुले,आंबेडकर छत्रपती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच चांदूररेल्वे,नांदगाव खंडेश्वर, धामणगाव येथील शिवभक्त महिला,पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे