अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खानापूर पांढरी……… येथे आदिवासी महिलेची विहिरीत ढकलून हत्या..

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खानापूर पांढरी………
येथे आदिवासी महिलेची विहिरीत ढकलून
हत्या..

MB NEWS:सुजित काठोळे(अंजनगाव सुर्जी):- तालुक्यातील खानापूर पांढरी येथे एका आदिवासी महिलेची पांढरी खानापूर येथील युवक गौरव प्रकाश हटवार यांनी विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना आज रोजी उघडकीस आली. मृतक बसंती इवणे ही महिला मध्यप्रदेशातील मालेगाव येथे रहिवाशी असून.

पांढरी खानापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या शेतात बरेच दिवसापासून कामधंदा करून उदरनिर्वाह करत होती. त्याचबरोबर
आरोपी गौरव हटवार हा देखील बरेच दिवसापासून दाभाडे यांच्या शेतात कामे करत होता.
अशातच बसंती इवने व आरोपी गौरव हटवार यांचे काही सूत जुळले .
मृत बसंती ही रात्री दिनांक.५.ला शेतातील गोठ्यात झोपली असताना गौरव हटवारा हा तेथे येऊन बसंतीला मारहाण करून तिला विहिरीत ढकलून दिले.
व घटनास्थळावरून प्रसार झाला. ही प्रत्यक्ष घटना मृतकच्या मुलांनी पाहिली व त्यांनी शेतमालकाला फोन करून सर्व आबिती सांगितले .त्यावर ज्ञानेश्वर दाभाडे शेतमालक यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावर
घटनास्थळी पोलीस येऊन बसवंती इवने हिचा मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. सदर .कायर्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू व दिपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी सुनील पाटील पो.हे कॉ संजय इंगळे व पोलीस कर्मचारी करीत आहेत

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे